Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : ‘मुळातच कथेत दम आणि सामान्य माणूस नायक असावा लागतो’, रोहित पवारांचा भाजपवर निशाणा, KGF आणि RRR चित्रपटाचा दाखला!

सध्या राज्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र भाजपच्या नव्या चित्रपटात राजकारण सोडून जनतेचं हित कुठंच दिसत नाही.उलट या नव्या स्टारकास्टची लबाडी रोज उघड होतेय, अशी टीका रोहित पवार यांनी केलीय.

Rohit Pawar : 'मुळातच कथेत दम आणि सामान्य माणूस नायक असावा लागतो', रोहित पवारांचा भाजपवर निशाणा, KGF आणि RRR चित्रपटाचा दाखला!
अजित पवारांच्या बोलण्याने भाजपची अडचण झाली असती, यांना सदबुद्धी प्राप्त होईल, हीच अपेक्षा, रोहित पवारांची खोचक फेसबुक पोस्ट
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 7:33 PM

मुंबई : राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे, हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील (MahaVikas Aghadi) नेते आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप आणि टीका सुरुय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विटरवरुन भाजपवर जोरदार टीका केलीय. यावेळी रोहित पवार यांनी KGF2 आणि RRR चित्रपटाचा दाखला दिलाय. ‘कसदार स्टारकास्ट सोबतच कथेत सामान्य माणसाचं हित दाखवण्याचा प्रयत्न असल्याने #KGF2 #RRR सारखे दाक्षिणात्य चित्रपट हिट होतायेत. पण सध्या राज्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र भाजपच्या नव्या चित्रपटात राजकारण सोडून जनतेचं हित कुठंच दिसत नाही.उलट या नव्या स्टारकास्टची लबाडी रोज उघड होतेय’, अशी टीका रोहित पवार यांनी केलीय.

‘भाजपचा सध्याचा चित्रपट फ्लॉप ठरतोय’

‘परिणामी भाजपचा सध्याचा चित्रपट फ्लॉप ठरतोय. म्हणूनच इतरांना तर सोडाच पण स्वतःच्याच 106 मधील बहुतांश लोकांनीही या चित्रपटाकडं पाठ फिरवल्याचं दिसतंय. त्यामुळं कदाचित पुढील चित्रपटात स्टारकास्ट बदललीही जाईल परंतु स्टारकास्ट बदलल्याने चित्रपट हिट होईलच असं नाही. त्यासाठी मुळातच कथेत दम आणि सामान्य माणूस नायक असावा लागतो. पण भाजपाकडून फक्त राजकीय नाटकंच सुरूय. भाजपला नाटक करुनच ‘पुन्हा येण्याचं’ गुळगुळीत स्वप्न साकार करायचं असेल तर यानिमित्ताने का होईना भविष्यात नायक म्हणून सामान्य माणूस आपल्या कथेत दाखवला जाईल का? हा खरा प्रश्न आहे’, असा सवालही रोहित पवार यांनी केलाय.

जिग्नेश मेवाणींवरुन रोहित पवारांची भाजपवर टीका

दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि आमदार जिग्नेश मेवाणी यांना आसाम पोलिसांनी एका प्रकरणात अटक केली होती. या प्रकरणी त्यांना जामीन मंजूर झाला होता. मात्र, दुसऱ्या एका प्रकरणात जिग्नेश मेवाणी यांना पुन्हा अटक करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे आमदार जिग्नेश मेवाणी अटकेवरुन भाजपवर मोठा आरोप केला होता. नवनीत राणा यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करताना, रोहित पवार यांनी जिग्नेश मेवाणी यांचा दाखला दिलाय. गुजरातमधील काँग्रेस जिग्नेश मेवाणी आमदार यांना एकामागोमाग एक गुन्ह्यात अटक करुन भाजपकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. त्यांच्याकडे जातीचं बोगस नाही तर अस्सलं सर्टिफिकेट आहे, तरी त्यांनी ना जातीचं हत्यार बाहेर काढलं ना वॉशरुमला जाऊ न दिल्याची तक्रार केली. विचारधारेशी तडजोड नाही!, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं होतं.

विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.