कर्जत नगर पंचायत निवडणूक : रोहित पवारांची सोमय्यांवर खोचक टीका, चंद्रकांत पाटलांनाही प्रत्युत्तर

कर्जत नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे 17 पैकी 17 उमेदवार विजयी होतील असा दावाही त्यांनी केलाय. पवार यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर खोचक शब्दात टीका केलीय. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं आहे.

कर्जत नगर पंचायत निवडणूक : रोहित पवारांची सोमय्यांवर खोचक टीका, चंद्रकांत पाटलांनाही प्रत्युत्तर
रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 5:05 PM

अहमदनगर : कर्जत नगर पंचायत निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी कर्जत नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे 17 पैकी 17 उमेदवार विजयी होतील असा दावाही त्यांनी केलाय. पवार यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर खोचक शब्दात टीका केलीय. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपच्या लोकांनी किरीट सोमय्या यांना जे काम दिलं आहे ते योग्य पद्धतीनं करत आहेत. ईडीला ज्या बातम्या कळत नाहीत त्या सोमय्या यांना आधी कळतात. ते जसे भाजपचे प्रवक्ते आहेत तसेच ईडीचेही प्रवक्ते आहेत. सिनेमा कितीही चांगला असला तरी आयटम साँग घ्यावेच लागते. सोमय्या हे राजकारण करत आहेत हे सर्वांनाच कळतं. आजही ते आमच्या नेत्यांबद्दल बोलतील. मात्र, कर्जतमधील नागरिक सूज्ञ आहेत. ते फक्त मनोरंजन म्हणून टाळ्या वाजवून जातील, अशी खोचक टीका रोहित पवार यांनी केली आहे.

‘मग तुम्ही ईडीच्या जोरावर भाजपप्रवेश करता काय?’

तर जनता भाजपला लोकशाही मार्गानेच उत्तर देईल. भाजपचे लोक आमच्याकडे येत असतात. तर हे प्रश्न त्यांना विचारला हवा की ते राष्ट्रवादीमध्ये का येत आहेत? चंद्रकांत पाटलांनी ट्वीट करुन विचारलं एका-एका जागेवर रोहित पवार लक्ष देत आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे की पैशाच्या जोरावर ते राष्ट्रवादीत घेत आहेत. मग तुम्ही काय ईडीच्या जोरावर राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये घेता काय? असा खोचक सवालही रोहित पवारांनी विचारलाय. चंद्रकांत पाटलांनी ट्वीट केलं त्याचं मला आश्चर्य वाटत असल्याचंही ते म्हणाले.

चंद्रकात पाटलांचं ट्वीट काय?

‘कर्जत नगरपंचायत निवडणुकीत ऐनवेळी भाजपा उमेदवाराचा पाठिंबा मिळवण्याची वेळ राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्यावर आली हा त्यांचा निवडणुकीपूर्वीच झालेला पराभव आहे. शरद पवार यांचा वारसा, राज्यात सत्ता, अजित पवार याचाच अर्थ जनता भाजपासोबत आहे आणि आमचा विजय निश्चित आहे. सत्तेचा दुरूपयोग आणि धनशक्ती विरोधात असली तरी जनशक्ती आपल्याकडे असल्याने राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार संघर्ष करा, असे माझे तेथील कार्यकर्त्यांना आवाहन आहेउपमुख्यमंत्री असूनही रोहीत पवार यांना एकेका जागेसाठी झुंजावे लागते’, असं ट्वीट चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी केलं आहे.

इतर बातम्या :

आघाडी सरकार हरवलं, शोधून देणाऱ्यास पुरस्कार देऊ; फडणवीसांचा घणाघात

ठाण्यात राष्ट्रवादीचा शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक; बोम्मईंच्या प्रतिमेला जोडे मारो!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.