ते लहान मुलांसारखे वागतात; रोहित पवार यांचा राम शिंदे यांना खोचक टोला
राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी भाजप नेते राम शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. जर एखाद्या लहान मुलाला चॅकलेट नाही मिळालं तर ते कसं रडतं, तसंच राम शिंदे वागत असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) नेते, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजप (BJP) नेते राम शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. जर एखाद्या लहान मुलाला चॅकलेट नाही मिळालं तर ते कसं रडतं, तसंच राम शिंदे वागत असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे. राम शिंदे यांचं वागणं लहान मुलासारखं असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, मला कळलं राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आपण अनेकदा पाहिलं असेल लहान मुलांना चॉकलेट दिलं नाही तर ते कसं करतात तशीच आवस्था आमच्या विरोधकांची आहे. कारखाना सुरू करून सामान्य लोकांना मदतच केली आहे, तरीही तुम्ही आमच्यावर कारवाईची मागणी करत आहात. असंही मला कळलं आहे की त्यांनी कारवाईच्या मागणीचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
भाजपावर निशाणा
दरम्यान दोन-तीन दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला होता. शिवसेनेनंतर आता भाजपाचा राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा डाव असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं होतं. हाच मुद्दा पकडून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील भाजपावर टीका केली होती.
काय म्हणाले मुंडे?
देशातील जेवढे प्रादेशिक पक्ष आहेत, त्याचं अस्तित्व भाजपाला संपवायचे आहे. मात्र राष्ट्रवादी संपवण्यासाठी भाजपाला दहा जन्म घ्यावे लागतील, तरीही राष्ट्रवादी संपणार नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं. तर तुमचा पक्ष संपवण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही असं म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे,