दाऊद इब्राहिमला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणा, रोहित पवारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदींकडे दाऊद इब्राहिम भारतात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे (Rohit Pawar Demand to PM Narendra Modi to do everything for bring Dawood Ibrahim in India).

दाऊद इब्राहिमला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणा, रोहित पवारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी
Follow us
| Updated on: Aug 23, 2020 | 10:21 AM

मुंबई : कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे त्याला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा, अशी विनंती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करुन ही मागणी केली आहे (Rohit Pawar Demand to PM Narendra Modi to do everything for bring Dawood Ibrahim in India).

“दाऊद इब्राहीम कराचीत असल्याचं पाकिस्तानं कबूल केलं आहे. त्याला भारतात आणण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न करा, अशी मी पतंप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो. दाऊदला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणा”, असं रोहित पवार म्हणाले आहेत (Rohit Pawar Demand to PM Narendra Modi to do everything for bring Dawood Ibrahim in India).

दाऊद इब्राहिम कराची शहरात असल्याच्या वृत्ताला पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही दुजोरा दिला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्यावतीने (UNSC) जगभरातील 88 दहशतवादी नेत्यांची एक यादी तयार करण्यात आली आहे. यात दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांचीही नावं आहेत.

पाकिस्तान सरकारने दाऊद इब्राहिमची स्थीर आणि जंगम अशी सर्व मालमत्ता गोठवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अहवालात देण्यात आली आहे. दाऊद इब्राहिमवर मुंबईमध्ये 1993 मध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बहल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. यामागे तोच मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे.

मुंबईतील या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 350 लोकांना आपला प्राण गमवावा लागला होता. तसेच 1200 हून अधिक लोक जखमी झाले होते. भारत सरकारने 2003 मध्ये अमेरिकेसोबत मिळून दाऊद इब्राहिमला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत टाकले होते.

इब्राहिम दाऊद आशिया खंडातील सर्वात मोठा ड्रग तस्कर

संयुक्त राष्ट्र आणि इंटरपोलने दाऊद इब्राहिमला आशिया खंडातील सर्वात मोठा अमली पदार्थ तस्कर म्हणून घोषित केलं आहे. त्याचे दहशतवादी संघटनांशी देखील संबंध असल्याचं म्हटलं आहे. भारताची गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्यूरोच्या (आयबी) माहितीनुसार दाऊद इब्राहिम आणि त्याचा छोटा भाऊ शेख अनीस इब्राहिम सिंथेटिक ड्रग्ससोबतच हेरोईन आणि अफीमचाही व्यवसाय करतो.

दाऊदची कुख्यात डी-कंपनी इंटरनॅशनल सिंडिकेट क्राईम आणि हवाला ऑपरेशन करण्यावर भर देत असल्याचंही समोर आलं आहे. आतापर्यंत डी कंपनीचा ल्यारी गँगसोबत कोणताही वाद समोर आलेला नाही. ल्यारी कराचीमधील दाट वस्ती असलेला परिसर आहे. ल्यारी गुन्हेगारी टोळ्या, ड्रग आणि बंदूक यांच्या व्यवसायासाठी कुख्यात आहे.

संबंधित बातमी : होय, दाऊद इब्राहिम कराचीतच, पाकिस्तानची पहिल्यांदाच कबुली

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.