काम घोळत न ठेवता थेट निर्णय ही दादांची स्टाईल, अजित पवारांच्या भेटीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर रोहित पवार आणि अजित पवार यांच्यात आज (18 ऑगस्ट) पहिली भेट झाली (Rohit Pawar meet Ajit Pawar).

काम घोळत न ठेवता थेट निर्णय ही दादांची स्टाईल, अजित पवारांच्या भेटीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Aug 18, 2020 | 9:09 PM

अहमदनगर : “कोणतंही काम घोळत न ठेवता थेट निर्णय घेण्याची दादांची स्टाईल असून ती मला भावते”, अशा शब्दात कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक केलं आहे (Rohit Pawar meet Ajit Pawar). रोहित पवार यांनी आज (18 ऑगस्ट) अजित पवार यांची भेट घेतली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर अजित पवार आणि रोहित पवार यांच्यातील ही पहिली भेट होती (Rohit Pawar meet Ajit Pawar).

रोहित पवार यांनी ट्विटरवर अजित पवार यांच्या भेटीची माहिती दिली आहे. मतदारसंघातील आणि इतर प्रश्नांसंबंधित चर्चा करण्यासाठी अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, या भेटीमागील खरा उद्देश अजून समोर आलेला नाही.

“मतदारसंघातील आणि इतर प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटलो. त्यांनी प्रश्न बारकाईने समजून घेत त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं. कोणतंही काम घोळत न ठेवता थेट निर्णय घेण्याची दादांची स्टाईल असून ती मला भावते. त्यानुसार या प्रश्नांवरही निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे”, असं रोहित पवार म्हणाले.

शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर प्रसारमाध्यमांसमोर टीका केल्यानंतर पवार कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हे तणावाचे वातावरण दोन दिवसात निवळेल, अशी माहिती पवार कुटुंबातील सदस्यांनी 15 ऑगस्ट रोजी दिली होती. अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी 15 ऑगस्ट रोजी पवार कुटुंबियांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पवार कुटुंबातील सदस्यांनी याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर आज रोहित पवार यांनी अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर रोहित पवार यांनी ट्विटरवर याबाबत माहिती देत पार्थ पवार संबंधित वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.