राम शिंदेंच्या मुलीचा विवाह सोहळा, रोहित पवार-फडणवीस आमनेसामने आले आणि…

राम शिंदे यांची कन्या डॉ. अक्षता शिंदे यांच्या लग्न समारंभाला देवेंद्र फडणवीस, रोहित पवार, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, यांच्यासह अनेक दिग्गज नेते मंडळींनी हजेरी लावली होती.

राम शिंदेंच्या मुलीचा विवाह सोहळा, रोहित पवार-फडणवीस आमनेसामने आले आणि...
राम शिंदे यांची कन्या डॉ. अक्षता शिंदे यांचा श्रीकांत खांडेकरांशी विवाह
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 8:54 AM

अहमदनगर : भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांच्या मुलीचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. राम शिंदे यांना डॉक्टर लेकीसाठी कलेक्टर जावई मिळाला आहे. लग्नाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हजेरी लावली होती. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि रोहित पवार यांची यावेळी आमनेसामने भेट झाली. दोघांनी हसतमुखाने एकमेकांना नमस्कार केला. (Rohit Pawar meets Devendra Fadnavis at Ram Shinde Daughter Wedding)

राम शिंदे यांची कन्या डॉ. अक्षता शिंदे (Dr Akshata Ram Shinde) यांच्या लग्न समारंभाला देवेंद्र फडणवीसांसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, रासप अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासह अनेक दिग्गज नेते मंडळींनी उपस्थित राहून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. डॉ. अक्षता शिंदे आणि आएएस श्रीकांत खांडेकर (Shrikant Khandekar) यांचा साखरपुडा व्हॅलेंटाईन डेला झाला होता.

Ram Shinde Daughter Wedding

राम शिंदे यांची कन्या डॉ. अक्षता शिंदे यांचा श्रीकांत खांडेकरांशी विवाह

कोण आहेत राम शिंदेंचे जावई?

श्रीकांत खांडेकर यांनी बी. टेकचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. शासकीय सेवेत रुजू होण्याची जिद्द मनात असल्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यामातून ते आयएएस झाले. त्यानंतर या घवघवीत यशाबद्दल सत्कार करण्यासाठी ग्रामस्थांनी तयारी सुरु केली. श्रीकांत यांचा सत्कार माजी मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्याचे ठरले. यावेळी राम शिंदे यांना आपली मुलगी डॉ. अक्षतासाठी योग्य वर म्हणून श्रीकांत खांडेकर मनात भरले. त्यानंतर हे नातं जुळून आलं.

गरिबीतून पुढे आलेले श्रीकांत खांडेकर

राम शिंदे हे जरी एक माजी मंत्री असले तरी त्यांचा होणारा जावई हा साधारण कुटुंबातील आहे. श्रीकांत यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शिक्षण केले. त्यांनी दिवसरात्र एक करुन यूपीएससीची परीक्षा पास केली. सध्या ते प्रशिक्षण घेत आहेत. तर राम शिंदे यांच्या कन्या अक्षता शिंदे डॉक्टर आहेत.

रोहित पवार आणि राम शिंदेंचा स्नेह

दरम्यान, रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या कौटुंबिक सोहळ्याला हजेरी लावण्यात नवल नाही. राजकीय विरोधक असूनही त्यांचा स्नेह सर्वांना परिचित आहे. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. टीका टिपण्णी आणि आरोप प्रत्यारोपांनी गाजलेली कर्जत जामखेडची निवडणूक गाजली होती.

रोहित पवार यांनी निवडणुकीतील सर्व मतभेद बाजूला ठेवून, विजयानंतर राजकीय सभ्यतेचं दर्शन घडवलं होतं. रोहित पवार यांनी विजय मिळवल्यानंतर राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. इतकंच नाही तर राम शिंदे यांच्या मातोश्रींच्या पाया पडून त्यांचेही आशीर्वाद रोहित पवार यांनी घेतले होते.

संबंधित बातम्या :

राऊतांच्या कन्येचा साखरपुडा; ठाकरे,पवार आणि फडणवीस भेटीचा पुन्हा एकदा योग!

माजी मंत्री राम शिंदेंना मिळाला कलेक्टर जावई, ‘व्हॅलेंटाईन डे’ला सुपारी फुटली

(Rohit Pawar meets Devendra Fadnavis at Ram Shinde Daughter Wedding)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.