जेव्हा शिवरायांचा खोटा इतिहास दाखवला जातो तेव्हा तुम्ही शांत आणि आता…- रोहित पवार

रोहित पवार यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या राजकारणावर प्रतिक्रिया दिली आहे.

जेव्हा शिवरायांचा खोटा इतिहास दाखवला जातो तेव्हा तुम्ही शांत आणि आता...- रोहित पवार
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 1:51 PM

बारामती : स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्या मुद्द्यावरून राज्यभर आंदोलनं करणाऱ्या विरोधकांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लक्ष केलंय. राज्यपालांनी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या बाबत खालच्या पातळीवर वक्तव्य केलं. एका चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपतींचा खोटा इतिहास दाखवला. त्यावेळी विरोधक शांत का होता?, असं रोहित पवार (Rohit Pawar) म्हणालेत.

माझा सावरकर यांच्या बाबतीतला अभ्यास नक्कीच कमी आहे. अभ्यास गरज आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या बाबतीत अभ्यास आहे त्यामुळे आपण लढतो. पण सावरकरांच्या बाबतीत चर्चा होणे आवश्यक आहे. त्यांनी लिहिलेले पुस्तकात नेमके काय मुद्दे आहेत हे लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे. राहुल गांधींचा विरोध कमी होते पण शिंदे गटाचे काही लोक, बीजेपी आणि मनसे यामध्ये राजकारण करीत आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, असंही रोहित पवार म्हणालेत.

भारत जोडो यात्रेत गेल्यानंतर मी त्यांना दोन वेळा भेटलो. आदिशक्ती आणि भक्ती शक्तीचं प्रतीक असलेली प्रतिकृती भेटवस्तू त्यांना दिली. उद्धव ठाकरे यांच्या फोटोचं संकलन असलेलं पुस्तक देखील त्यांना भेट दिलं. ग्रामीण भागात सारखी शहरी भागात देखील रोजगार हमीची योजना यावी, या आशयाचं निवेदन देखील मी त्यांना दिलं. ते सर्वांचे म्हणणे ऐकून घेतात लोक या येथे स्वयंपूर्ण सहभागी होत आहेत, असं म्हणत रोहित पवार यांनी राहुल गांधींच्या भेटीचा अनुभव सांगितला आहे.

टिकलीचं प्रकरण राहुल गांधी महाराष्ट्रात आल्यानंतर झालं. खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन मंत्री अब्दुल सत्तार यांनी वक्तव्य केलं, ते सुद्धा राहुल गांधी महाराष्ट्रात आल्यानंतर झालं. जितेंद्र आव्हाड यांना जेलमध्ये टाकले. त्यानंतर त्यांच्यावर वेगळी कारवाई करण्याचा प्रयत्न झाला.खासदार संजय राऊत हे बाहेर आल्यानंतर पुन्हा त्यांना काही संघटना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व गोष्टी राहुल गांधी महाराष्ट्रात आल्यानंतरच का घडत आहेत? असा प्रश्न महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेला पडला आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी शिंदे सरकारच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केलाय.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.