पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवून दिली; रोहित पवारांचा टोला
राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई : राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून (graduate-teacher constituency election results) राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्यानं भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह (Aurangabad) हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर (graduate-teacher constituency election results) मतदारसंघही गमवावा लागला आहे. पदवीधरच्या या तिन्ही मतदारसंघात भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी ठरलाय.
पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी गुलाल उधळला आहे. या विजयानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरुन महाविकास आघाडीचे अभिनंदन केले आहे, तसेच भाजपलाही जोरदार टोला लगावला आहे. रोहित पवारांनी एक ट्विट केलं आहे, त्यामध्ये म्हटलं आहे की, “भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली आहे”. (Rohit Pawar slams BJP after celebrated victory in graduate-teacher constituency election results )
अजून एका ट्विटमध्ये रोहित पवारांनी लिहिले आहे की, “भाजपच्या म्हणवल्या जाणाऱ्या नागपूर, पुण्यासारख्या बुरुजालाही सुरुंग लावत महाविकास आघाडीने विजयाचा झेंडा रोवला आहे. त्यामुळं आता तरी भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात करायला हरकत नाही”.
भाजपचे म्हणवल्या जाणाऱ्या नागपूर, पुण्यासारख्या बुरुजालाही सुरुंग लावत इथं #महाविकासआघाडीने विजयाचा झेंडा रोवला. त्यामुळं आतातरी @BJP4Maharashtra ने खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात करायला हरकत नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 4, 2020
अरुण लाड यांना विजयी गुलाल
पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना धूळ चारत विजय मिळवला आहे. अरुण लाड यांना 1लाख 22 हजार 145 मतं मिळाली आहेत. तर भाजपचे संग्राम देशमुख यांना 73 हजार 321 मतांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे अरुण लाड यांनी देशमुखांवर तब्बल 48 हजार 824 मतांनी विजय मिळवला आहे.
बालेकिल्ल्यातही भाजपला धक्का
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील प्रतिनिधीत्व केलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडी पर्यायानं काँग्रेसचे उमेदवार अभिजत वंजारी यांनी पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. मात्र, विजयी होण्याचा कोटा असलेली 60 हजार 747 मतं त्यांना मिळाली नाहीत. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु झाली आहे.
पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये अभिजित वंजारी यांना 55 हजार 947 मतं मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना 41 हजार 540 मतांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे अभिजित वंजारी यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा हक्काचा मानला जात असताना, अभिजित वंजारी यांचा विजय हा विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का मानला जात आहे.
हिंमत असेल तर एकटे लढा- चंद्रकांत पाटील
पुणे आणि नागपूर पदवीधरची जागा गमावल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एकएकटे लढा असं आव्हान महाविकास आघाडीतील घटकपक्षांना केलं आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचं खच्चीकरण झालंय. तर राष्ट्रवादीने आपली संघटना मजबूत केली आहे, असं वक्तव्य करत त्यांनी शिवसेनेला एकप्रकारे सूचक इशाराच दिलाय. तर पुण्यात आणि नागपुरात अपक्ष उमेदवाराने अजून काही मतं घेतली असती तर विजय आमचाच होता, असं म्हणत पाटील यांनी आपला पराभव मान्य केला आहे.
संबंधित बातम्या
जिथे चंद्रकांत पाटील सलग जिंकले, तिथे संग्राम देशमुख कसे हरले?
(Rohit Pawar slams BJP after celebrated victory in graduate-teacher constituency election results)