AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जामखेडमध्ये रोहित पवारांकडूनही फोडाफोडी, राम शिंदेंना घेरण्याची तयारी?

पुतण्याच्या प्रचारासाठी पक्षाचे नेते अजित पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. तर रोहित पवारांनीही (Rohit Pawar vs Ram Shinde) स्थानिक राजकारणात भाजपच्या नेत्यांना राष्ट्रवादीत घेण्यासाठी कंबर कसली आहे. राम शिंदेंचे जवळचे सहकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

जामखेडमध्ये रोहित पवारांकडूनही फोडाफोडी, राम शिंदेंना घेरण्याची तयारी?
| Edited By: | Updated on: Sep 23, 2019 | 5:41 PM
Share

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार सध्या नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात तळ ठोकून आहेत. या मतदारसंघात पालकमंत्री राम शिंदे विरुद्ध रोहित पवार (Rohit Pawar vs Ram Shinde) अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. पुतण्याच्या प्रचारासाठी पक्षाचे नेते अजित पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. तर रोहित पवारांनीही (Rohit Pawar vs Ram Shinde) स्थानिक राजकारणात भाजपच्या नेत्यांना राष्ट्रवादीत घेण्यासाठी कंबर कसली आहे. राम शिंदेंचे जवळचे सहकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

राम शिंदेंचा कट्टर समर्थक राष्ट्रवादीत

बालेकिल्ला राखण्यासाठी भाजपला जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. एकास एक लढत झाल्यास ही निवडणूक अटीतटीची होईल आणि राम शिंदे विरुद्ध रोहित पवार (Rohit Pawar vs Ram Shinde) असे चित्र दिसेल. विशेष म्हणजे आतापर्यंत या मतदारसंघात राम शिंदेंविरुद्ध तालुक्यातील एकही विरोधक निर्माण झाला नाही. तसेच आत्तापर्यंत विरोधकांना निवडणूक जिंकता आली नाही. त्यामुळे शिंदे यांनी एकहाती वर्चस्व प्रस्थापित केलंय.

गेल्या 30 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. तर गेल्या 10 वर्षांपासून राम शिंदे (Rohit Pawar vs Ram Shinde) आमदार आहेत. मात्र यंदा ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांनी पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादीच्या सभेत अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार आहेत. मोरे हे पालकमंत्री राम शिंदे यांचे कट्टर समर्थक होते.

राम शिंदेंना विजयाचा विश्वास

पालकमंत्री राम शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे सहकारी मानले जातात. 2014 ला सर्वच पक्ष स्वबळावर लढल्याने मतविभाजन होऊन राम शिंदे निवडून आले. आता सर्व विरोधक एकत्र आल्यास ही निवडणूक शिंदे यांना सोपी नाही. त्यात बारामतीकरांनी लक्ष दिलं आहे.

पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीतील रोहित पवार यांनी मतदारसंघात दुष्काळात पाणी वाटप, आर्थिक मदत, गरजू मुलांना-मुंलींना दत्तक घेतलं आहे. तरुणांशी थेट संवाद यामुळे ते चर्चेत आहेत. सध्या कर्जत-जामखेड (Rohit Pawar vs Ram Shinde) मतदारसंघ पिंजून काढलाय. मात्र धनाढ्य शक्ती जरी माझ्या विरुद्ध असली तरी मी जे काम केलंय, तसेच पुढच्या मंत्रिमंडळात मला मंत्री करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय, त्याला ही जनता तडा जाऊ देणार नाही, असा विश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केला.

काँग्रेस-राष्ट्रवादीतही इच्छुकांची गर्दी

माजी जिल्हापरिषद अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्ष मंजूषा गुंड यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. त्यात काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी ही आमची जागा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे रोहित पवारांसमोर देखील अनेक आव्हाने आहेत.

रोहित पवार यांनी मात्र लोकांचा पाठिंबा आपल्यालाच असल्याचा दावा केलाय. या मतदारसंघात फिरत असताना अनेक अडचणी आहेत, असं लक्षात आलं. समोर मंत्री असले तरी मी विचार करत नाही. ही व्यक्तीच्या विरुद्ध लढाई नसून विचाराच्या विरुद्ध लढाई असल्याचं रोहित पवार (Rohit Pawar vs Ram Shinde) म्हणाले. राम शिंदे यांनी फक्त आश्वासने दिली असून पुढच्या काळात जनता विकासाच्या पाठीशी उभे राहिल. ही जनता मलाच निवडून देईल, असा आत्मविश्वास रोहित पवारांनी व्यक्त केलाय.

विविध पक्षांचे संभाव्य उमेदवार

  • भाजपकडून पालकमंत्री राम शिंदे
  • राष्ट्रवादीकडून रोहित पवार, महिला आघाडी अध्यक्षा मंजूषा गुंड
  • काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्या पत्नी मीनाक्षी साळुंके
  • वंचित बहुजन आघाडीकडून अॅड. अरुण जाधव
  • मनसेकडून सचिन पोटरे इच्छुक

विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येतीय तशी धाकधूक वाढतच आहे. यंदाची निवडणूक पवारांसाठी प्रतिष्ठेची आहे. यात राम शिंदे आपला गड शाबूत ठेवणार का हा मोठा प्रश्न आहे. पवारांनी लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये एका नातवाचा पराभव पाहिला आहे. त्यामुळे पवारही यावेळी नातवाच्या विजयासाठी स्वतः मैदानात उतरतील यात शंका नाही. तर अजित पवारही आपल्या मुलाच्या पराभवानंतर पुतण्यासाठी पहिल्यांदाच कर्जतच्या दौऱ्यावर आहेत.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.