Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा वस्तुस्थिती अहवाल दाखल करा”, महिला आयोगाचे पोलिसांना आदेश

महिला आयोगाचं ठाणे पोलोसांना पत्र, वाचा...

जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा वस्तुस्थिती अहवाल दाखल करा, महिला आयोगाचे पोलिसांना आदेश
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 8:23 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad Molestation Case) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामाही दिला. मात्र या घटनेचा व्हीडिओ सार्वजनिक झाला आहे. यात कुठेही विनयभंग झाला नाही. पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे, असा दावा राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. या प्रकरणी महिला आयोगाच्या वतीने ठाणे पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.

महिला आयोगाचं पत्र

प्रति, मा. पोलीस आयुक्त, पोलीस आयुक्त यांचे कार्यालय, ठाणे शहर.

विषय : श्री. जितेंद्र आव्हाड यांच्याविरुध्द दाखल गुन्हयाचा वस्तुस्थितीदर्शक

अहवाल सादर करणेबाबत.

महोदय,

महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास श्रीमती ऋता जितेंद्र आव्हाड यांचा अर्ज प्राप्त झाला आहे. आपल्या सुलभ संदर्भासाठी सोबत अर्जाची प्रत जोडण्यात आली आहे.

श्री. जितेंद्र आव्हाड यांच्याविरुध्द आपले परिक्षेत्रातील मुंब्रा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांनी दाखल केलेला गुन्हा राजकीय सुडबुध्दीने दबावतंत्र वापरून केला असल्याने सदरील गुन्हा रद्द करण्यात यावा व फिर्यादी महिलेवर खोटा गुन्हा दाखल केला म्हणून कायदेशीर कारवाई करावी, असे अर्जदार यांनी नमूद केले आहे. सदर प्रकरणी मुळ फिर्यादी महिलेने दाखल केलेला गुन्हा आणि परस्परविरुध्द प्राप्त झालेले तक्रार अर्ज या दोन्ही बाबीत सत्यता पडताळून महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोग कार्यालयास सादर करावा.

रुपाली चाकणकर अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग

मुंबईच्या मुंब्रा भागात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप रिदा रशीद यांनी केला. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात महिला आरोगाने ठाणे पोलिसांना पत्र लिहिलंय. याला पोलिसांच्या वतीने काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्वाचं असेल.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.