“स्वत: शेण खाता अन् ‘त्या’ महिलेचा दाऊदशी संबंध जोडता, राहुल शेवाळे तुम्हाला लाज वाटली पाहिजे!”

रुपाली पाटील यांचं राहुल शेवाळेंना आव्हान, म्हणाल्या...

स्वत: शेण खाता अन् 'त्या' महिलेचा दाऊदशी संबंध जोडता, राहुल शेवाळे तुम्हाला लाज वाटली पाहिजे!
Follow us
| Updated on: Dec 25, 2022 | 2:23 PM

मुंबई : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर शोषणाचे आरोप ठेवण्यात आले आहेत. एका फॅशन डिझायनरचं आरोप ठाकरे गटाने शेवाळेंवर आरोप केले आहेत.याबाबत राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी पत्रकार परिषद घेत सगळे आरोप फेटाळले आहेत. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil Thombre) यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना शेवाळेंना आव्हान दिलं आहे.

“राहुल शेवाळे स्वत: शेण खातात आणि त्या महिलेचा दाऊदशी संबंध जोडतात. राहुल शेवाळे यांना असं बोलताना लाज वाटली पाहिजे!”, असं रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.

“राहुल शेवाळे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या जीवाला धोका आहे”, असंही रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.

एकीकडे राहुल शेवाळे म्हणतात की या महिलेचा दाऊदशी संबंध आहे. तर मग राहुल शेवाळे आणि या महिलेचे जवळचे संबंध होते. अगदी वरचेवर बोलणं व्हायचं याचा अर्थ राहुल शेवाळे यांनी दाऊदतच्या हस्तकाशी संबंध ठेवले आणि तिला देशातील अंतर्गत माहिती पुरवली, असा अर्थ घ्यायचा का?, असा सवाल रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.

शेवाळे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेचा दाऊदशी संबंध नाही. पण जर शेवाळे तसा आरोप करत असतील तर शेवाळेंनी देशाच्या विरोधात काम केलं, असं म्हणत शेवाळेंवरच कारवाई व्हायला पाहिजे, असं रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.

फेक अकाऊंटच्या माध्यमातून महिलेने मला ब्लॅकमेल केलं. या महिलेची पार्श्वभूमी पाहता ती महिला गुन्हेगारी पार्श्वभूमीची असल्याचं लक्षात येतं. तिच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. माझ्यावर आरोप करणारी महिला दोन वेळा कराचीला जाऊन आली आहे. या महिलेची दाऊद आणि पाकिस्तानशी लिंक आहे. पाकिस्तानी एजंटच्या मदतीने तिने फेक अकाऊंट सुरू केलं होतं. या महिलेची पार्श्वभूमी गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे, असं म्हणत राहुल शेवाळे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. त्यावर रुपाली पाटलांनी पलटवार केलाय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.