Saamana : रामाच्या नावानं तुकडे तुकडे गॅंग ! सामनामध्ये मनसे भाजपची बी टीम असल्याचा उल्लेख

रामनवमीच्या दिवशी दहा राज्यात दंगली झाल्या, हे चित्र चांगले नाही. यापूर्वी रामनवमीच्या शोभायात्रेत फक्त धर्म आणि संस्कृतीचे प्रदर्शन असे. आता अशा शोभायात्रेत तलवारी नाचवल्या जातात. धार्मिक द्धेष निर्माण केला जातो. सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी 15 वर्षात अखंड हिंदू राष्ट्र होईल, असे सांगितले आहे.

Saamana : रामाच्या नावानं तुकडे तुकडे गॅंग ! सामनामध्ये मनसे भाजपची बी टीम असल्याचा उल्लेख
सामनामध्ये मनसे भाजपची बी टीम असल्याचा उल्लेख Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 7:30 AM

मुंबई – रामनवमीच्या दिवशी दहा राज्यात दंगली झाल्या, हे चित्र चांगले नाही. यापूर्वी रामनवमीच्या शोभायात्रेत फक्त धर्म आणि संस्कृतीचे प्रदर्शन असे. आता अशा शोभायात्रेत तलवारी नाचवल्या जातात. धार्मिक द्धेष निर्माण केला जातो. सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी 15 वर्षात अखंड हिंदू राष्ट्र होईल, असे सांगितले आहे. त्याची ही सुरूवात आहे अशी सामनाच्या (Saamana) आजच्या अग्रेलेखातून टीका केली आहे.महाराष्ट्रात (Maharashtra) मशिंदीवरील भोंगे आणि रामनवमीच्या दंगलींचे राजकारण आता संपुर्ण देशात सुरू झाले आहे. धर्मांधतेची आग लावून शांततेला चूड लावून कुणाला निवडणुका जिंकायच्या असतील ते देशाच्या दुसऱ्या फाळणीला सुरूंग स्वत:च्या हाताने पेरताना दिसत आहे. त्यांना देशाचे तुकडे झाले तरी चालतील. देशात दंगली घडवून भाजपाला निवडणूका जिंकायच्या असं धोरण भाजपने उघडपणे स्विकारले आहे.

रामनवमीच्या दिवशी दहा राज्यात दंगली

रामनवमीच्या दिवशी दहा राज्यात दंगली झाल्या. झालेल्या राज्यांत लवकरचं विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये प्रामुख्याने झारखंड, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. रामनवमी निमित्त अनेक ठिकाणी शोभायात्रा काढण्याात आल्या त्यावर दुसऱ्या गटांकडून दगडफेक करण्यात आली. विशेष म्हणजे मुंबईतल्या मानखुर्द परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. गुढी पाडव्याच्या दिवशी मुस्लीम वस्तीतून अनेक शोभा यात्रा निघाल्या परंतु त्यावर कोणीही दगडफेक केली नाही. हे सर्व प्रकार रामनवमीच्या दिवशी का व्हावेत असा सवाल सुध्दा सामनाच्या अग्रलेखात उपस्थित केला आहे. मुंबईत शिवसेनेने हिंदुत्वाच्या शोभायात्रा काढल्या तर त्यावर हे असे हल्ले वगैरे होणार नाहीत. पण भाजप किंवा बी टीमने अशा यात्रा काढल्या तर हमखास गडबड होईल.

हिंदु आणि मुस्लीमांमध्ये वाद पेटवायचे आणि निवडणुका जिंकायच्या

दिल्लीतल्या जेएनयू विद्यापीठात रामनवमीच्या दिवशी दोन गटात मारामारी झाली. त्यामध्ये दहा विद्यार्थ्यांची डोकी फुटली आहेत. शाकाहार आणि मांसाहार यावरून ही दंगल पेटवण्यात आली होती. ज्यांची डोकी फुटली ते सगळे विद्यार्थी हिंदू होते. रामजन्मदिनी मासांहार करायचा नाही यामुळे वाद झाला. हिंदु आणि मुस्लीमांमध्ये वाद पेटवायचे आणि निवडणुका जिंकायच्या अशी सद्याचं भाजपाचं धोरण आहे अशी टीका सामानामधून करण्यात आली आहे.

Petrol diesel price : कच्च्या तेलाचे दर वाढले ; इंधनाच्या दरात कोणतीही वाढ नाही, सलग बाराव्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर

Hanuman Jayanti Delhi : हनुमान जयंतीच्या शोभायात्रेवेळी दिल्लीत मोठा राडा, अनेक गाड्यांची तोडफोड, पोलीसही जखमी

तुम्हीही पॅनकार्डचा ओळखपत्र म्हणून उपयोग करता? वेळीच सावध व्हा अन्यथा होऊ शकते फसवणूक

पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...