AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saamana : रुपया तळाला आणि लोकशाही रसातळाला! शिवसेनेचा भाजपवर सामना अग्रलेखातून निशाणा

रुपया असा उदध्वस्त झालेला पाहणे हे सर्व काही ठीकठाक असल्याचे लक्षण आहे काय? सध्या भारतात परिस्थिती चांगली नाही, त्यावर उपाय करण्याची गरज आहे.

Saamana : रुपया तळाला आणि लोकशाही रसातळाला! शिवसेनेचा भाजपवर सामना अग्रलेखातून निशाणा
सामना अग्रलेखातून टीका Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 21, 2022 | 7:40 AM
Share

मुंबई : “महाराष्ट्रातील (Maharashtra) फुटीर गटाचे नेते गुवाहाटी (Guwahati) येथे आपल्या आमदारांना ठासून सांगत होते की, “चिंता करू नका. आपल्यामागे एक महाशक्ती उभी आहे.” मात्र त्याच महाशक्तीच्या राज्यांत ‘रुपया’ खतम झाला. त्यामुळे आमदार खासदारांना खोक्यात किमती मोजाव्या लागल्या. पण शेतकऱ्यांच्या मालास दमडीचा हमीभाव द्यायला महाशक्तीचे सरकार (Goverment) तयार नाही. रुपयाने डॉलरच्या तुलनेत 80 रुपयांच्या खाली येत ऐतिहासिक ‘नीचांक’ गाठला आहे. लोकशाहीची अवस्थाही घसरलेल्या रुपयापेक्षा वेगळी नाही. रुपया तळाला आणि लोकशाही रसातळाला, अशी भयंकर अवस्था सध्या आपल्या देशाची झाली आहे. सत्तानंदात मग्न असणाऱ्या राज्यकर्त्यांना त्याची ना फिकीर आहे ना काळजी!”अशी टीका आजच्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. सामनाच्या अग्रलेखातून अनेकदा विरोधकांचा समाचार घेतला जातो. आज सुध्दा देशातल्या आणि राज्यातल्या घडामोडीवरून शिंदे गट आणि भाजपवरती टीका केली आहे.

श्रीलंकेतील सामान्य जनता राष्ट्रपती भवनात घुसली होती

रुपया आणि लोकशाही यांचा भाव आपल्या देशात कमालीचा किती घसरला आहे हे सगळा देश पाहतोय. रुपया डॉलरच्या तुलनेत 80 रुपयांच्याही खाली आला आहे. इतकी मोठी पडझड होऊन देखील भारताची अर्थव्यवस्था ताळ्यावर आहे. असे सरकारतर्फे सांगणे ही मुळफेक आहे. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँकेने शर्थ करूनही कोसळणाऱ्या रुपयास आधार मिळू शकला नाही. जनतेच्या उद्रेकामुळे श्रीलंकेच्या राष्ट्रपती व पंतप्रधानांना पायउत्तार व्हावं लागलं. श्रीलंकेतील सामान्य जनता राष्ट्रपती भवनात घुसली होती. त्यावर भारताने या सगळयाचा आपल्या देशावर नक्की काय परिणाम होऊ शकतो. यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अर्थमंत्री व परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी जाहीर केले की, “श्रीलंकेबरोबर आपल्या देशाची तुलना करणे बरोबर नाही. आपले परिस्थितीवर नियंत्रण आहे.

सध्या भारतात परिस्थिती चांगली नाही, त्यावर उपाय करण्याची गरज आहे

रुपया असा उदध्वस्त झालेला पाहणे हे सर्व काही ठीकठाक असल्याचे लक्षण आहे काय? सध्या भारतात परिस्थिती चांगली नाही, त्यावर उपाय करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महाग होत जाईल तसतशी महागाईची आग देशात वाढत जाईल. रशिया युक्रेन युद्धाच्या या झळा आहेत असं सरकारकडून सांगण्यात येतंय, पण त्याचवेळी देशातील विरोधकांची सरकारे खाली खेचण्यासाठी, आमदार-खासदारांची खरेदी विक्री करण्यासाठी हजार-हजार कोटी रुपयांचा खुर्दा बाजारात उडविला जात आहे. सामान्य जनतेने महागाईशी सामना करायचा आणि राज्यकर्त्यानी आमदार-खासदारांवर दौलतजादा करून राजकारण करायचे, हा काय प्रकार आहे? अशी सुद्धा टीका सामनातून करण्यात आली आहे.

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.