AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saamana : भाजपची भूमिका म्हणजे करून करून भागले आणि देवपूजेला लागले, सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवरती जोरदार टीका

बग्गा यांची आत्तापर्यंतची भूमिका संशयास्पद राहिली आहे. बग्गा यांनी विरोधकांवरती अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत अनेकांवर हल्ले केले आहेत.

Saamana : भाजपची भूमिका म्हणजे करून करून भागले आणि देवपूजेला लागले, सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवरती जोरदार टीका
भाजपची भूमिका म्हणजे करून करून भागले आणि देवपूजेला लागलेImage Credit source: twitter
| Updated on: May 09, 2022 | 7:27 AM
Share

मुंबई – लोकशाही परंपरांत तरी सत्तेचा अमर्याद गैरवापर कोणी करू नये. पोलिसांचा व केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर कोण करत आहे. हे देशाची जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कितीही झुंडशाही, मनमानी केली तरी केंद्र सरकारचे पोलीस (Central Government Police) त्यांची बेकायदेशीर पद्धतीने सुटका करून आरोपींना पळवून लावतात. बग्गा यांना अटक करून पंजाबात नेऊ नये म्हणून भाजपशासित राज्यांनी पंजाब पोलिसांची (Punjab Police) अड़वणूक केली आहे. तसेच त्यांची बेकायदेशीर पद्वतीने सुटका करून पळवून लावले. यालाच अराजक किंवा हुकूमशाही म्हणतात. या प्रवृत्तीस बळ देणारे एक दिवस याच मातीत मिसळतील. तोपर्यंत देश अखंड राहील काय ? असा सवाल आजच्या सामनाच्या (Saamana) अग्रलेखात उपस्थित केला आहे.

सत्तेची फार खतरनाक असते

सत्तेची फार खतरनाक असते. त्या नशेने आत्तापर्यंत अनेकांना बरबाद केले आहे. त्यामुळे लोकशाही परंपरांत तरी सत्तेचा अमर्याद गैरवापर कोणी करू नये. दिल्लीतल्या भाजप नेत्याला दिल्ली पंजाब पोलिसांनी अटक केली. त्यावेळी केंद्र सरकारकडून त्याला वाचवत असल्याचं एक भलतंचं नाट्या पाहायला मिळालं. भाजपच्या तेजिंदर बग्गा यांना पंजाब पोलिसांनी पकडणं म्हणजे हुकुमशाही असल्याचं भाजपचे नेते ओरडून सांगत आहेत. पंजाब पोलिसांच्या कृतीने भाजपाच्या अनेक नेत्यांना धक्का बसला आहे अशी चिंता भाजप पक्षाकडून व्यक्त करण्यात आली आहे. भाजपची भूमिका म्हणजे करून भागले आणि देवपूजेला लागले अशी आहे.

खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे.

बग्गा यांची आत्तापर्यंतची भूमिका संशयास्पद राहिली आहे. बग्गा यांनी विरोधकांवरती अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत अनेकांवर हल्ले केले आहेत. दिल्लीचे मु्ख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जीवीतास धोका निर्माण होईल अशा भाषेचा वापर करून कार्यकर्त्यांना भडकवले आहे. केजरीवालांना जीवंत सोडणार नाही अशा पध्दतीची भाषा त्यांनी वापरली आहे. त्यावर पंजाब पोलिसांनी गुन्हा दाखल करून बग्गाला अटक केली होती. परंतु दिल्ली पोलिसांनी त्या प्रकरणात हस्तक्षेप करून बग्गा याची सुटका केली आहे. यालाच अराजक किंवा हुकूमशाही म्हणतात अशी टीका करण्यात आली आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.