फसवणाऱ्यांना दिलासा ! माय लॉर्ड, हे काय ? सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्यावरती जोरदार टीका

"महाराष्ट्रात (Maharashtra) एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या लोकांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा ताबा घेतलाच आहे. न्यायपालिकांनी तरी आपल्यावर शिंतोडे उडू देऊ नयेत, पण काय करणार ? मला न्याय हवा असेल तर मी न्यायालयात जाणार नाही, तेथे न्याय मिळत नाही, असे माझी सर न्यायाधिश रंजन गोगाई (Ranjan Gogoi) यांनी म्हटले आहे.

फसवणाऱ्यांना दिलासा ! माय लॉर्ड, हे काय ? सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्यावरती जोरदार टीका
सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्यावरती जोरदार टीका Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 7:18 AM

मुंबई – “महाराष्ट्रात (Maharashtra) एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या लोकांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा ताबा घेतलाच आहे. न्यायपालिकांनी तरी आपल्यावर शिंतोडे उडू देऊ नयेत, पण काय करणार ? मला न्याय हवा असेल तर मी न्यायालयात जाणार नाही, तेथे न्याय मिळत नाही, असे माझी सर न्यायाधिश रंजन गोगाई (Ranjan Gogoi) यांनी म्हटले आहे. सरन्यायाधीशांची ही अवस्था असेल तर सामान्यांचे काय ? विक्रांत युद्धनौकेच्या नावावर पैसे गोळा करून अपहार करणे हा देशद्रोह नाही काय ? माय लॉर्ड, तुम्हीच सांगा !” अशी टीका आजच्या सामनाच्या (Saamana) अग्रलेखातून केंद्रीय तपास यंत्रणांवरती करण्यात आली आहे.

विक्रांतच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी जनतेचा पैसा लुटला

विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या या दोघांनी जनतेचा पैसा लुटला आहे. ज्यावेळी त्यांच्यावरती ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी दोघेही फरार झाले होते. कोट्यावधी रूपयांचा अपहार करणाऱ्या दोन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जामीन दिल्यानंतर हे सोमय्या पिता-पुत्र पुन्हा प्रकट झाले आहेत. ज्यांच्यावर पैशाचा अपहार केल्याचा आरोप आहे. न्यायालयाने त्यांना रोज पोलिस स्टेशनला हजेरी लावयला सांगितली आहे असे हे किरीट सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार का ? असा सवाल देखील सामनाच्या अग्रेलखात उपस्थित करण्यात आला आहे.

जमा केलेली रक्कम राजभवनात देऊ असं वचन देण्यात आलं होतं

किरीट सोमय्यांनी विक्रांतच्या नावाखाली जनतेचा पैसा लुटला आहे. त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे. आयएनएस विक्रांतच्या नावाखाली जो काही पैसा जमा केला आहे. तो राजभवनात जमा करू असं वचन किरीट सोमय्या यांनी दिले होते. पण जमा केलेली रक्कम मधल्यामधी गायब झाली. राजभवनाने ती रक्कम आमच्याकडे आली नसल्याचे लेखी सांगितले आहे. पण आपले न्यायालय पैशांच्या अपहाराचा हा पुरावा आहे असे मानायला तयार नाही. किरीट सोमय्यांच्या वकीलांनी सांगितले की जमा केलेला पैसा राजभवनात जमा केलेला नाही. आरोपीने हे पैसे भाजपच्या कार्यालयात जमा केले आहेत. भाजपच्या कार्यालयात विक्रांतचा निधी जमा केला व शेकडो लोकांची फसवणूक झाली हे मानायला आमचे न्यायालय तयार नसेल तर आपण कोणत्या युगातून जात आहोत, येणारा काळ किती कठीण आहे, हे लक्षात येईल.

Petrol, diesel price: इंधनाचे भाव कसे कमी होणार?, पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितला उपाय

today Petrol diesel rate : सलग दहाव्या दिवशी इंधनाचे दर स्थिर, मात्र एक्साइज ड्यूटी कमी होणार नसल्याचे संकेत

विमा पॉलिसी खरेदी करून फसला आहात; नको असलेल्या पॉलिसीमधून अशी करा आपली सुटका

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.