Saamana : 2024 ची तयारी मोदी व त्यांचा पक्ष वेगळ्या पद्धतीने करतोय, पण कॉंग्रेसचा गळती हंगाम सुरू
जाबमधील काँग्रेसचे नेते सुनील जाखड आणि गुजरातमधून हार्दिक पटेल यांनी पक्षाचा त्याग केला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे चिंतन शिबीर पार पडले. त्या चिंतन शिबिराची मांडव परतणी सुरू असतानाच काँग्रेसला ही अशी गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई – “राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काँग्रेसच्या (Congress) उदयपूर (Udaypur) येथे झालेल्या चिंतन शिबिरात अनेक प्रश्न अधांतरी सोडले. त्याच कारणास्तव राज्या- राज्यांतील अनेक नेते काँग्रेस सोडताना दिसत आहेत. 2024 ची तयारी मोदी व त्यांचा पक्ष वेगळय़ा पद्धतीने करीत असताना काँग्रेसमधील ‘गळती’ हंगाम सुरूच आहे आणि त्या पक्षाची अवस्था आभाळ फाटल्याप्रमाणे झाली आहे. संसदीय लोकशाहीसाठी हे चित्र बरे नाही. जाखड, हार्दिक यांच्यानंतरही ठिगळे वाढतच जाण्याची भीती आहे. ही भोके शिवणार कशी ?” असा सवाल आजच्या सामना अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.
अनेक मोठे पक्ष सोडून जात आहेत
पंजाबमधील काँग्रेसचे नेते सुनील जाखड आणि गुजरातमधून हार्दिक पटेल यांनी पक्षाचा त्याग केला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे चिंतन शिबीर पार पडले. त्या चिंतन शिबिराची मांडव परतणी सुरू असतानाच काँग्रेसला ही अशी गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही काळापासून ‘गळती’ हा प्रकार काँग्रेसला नवीन राहिलेला नाही. अनेक मोठे पक्ष सोडून जात आहेत, पण त्यांना थांबवण्यात कॉंग्रेसला आत्तापर्यंत अपयश आले आहे. पण सोनिया गांधींपासून राहुल गांधींपर्यंत सगळ्य़ांनीच काँग्रेस पुन्हा उभी करण्यासाठी ‘हाक ‘ दिली असतानाच नव्याने गळतीला आरंभ व्हावा हे चिंताजनक आहे.
तिघांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पित्यांपेक्षा मोठय़ा निघाल्या
सुनील जाखड हे त्याच बलरामांचे चिरंजीव आहेत. पंजाब काँग्रेसचे त्यांनी अनेक वर्षे नेतृत्व केले आहे. नवज्योत सिद्धूला फाजील महत्त्व मिळाल्याने जाखड बाजूला फेकले गेले आहेत. त्याच जाखड यांनी शेवटी भारतीय जनता पक्षाची वाट धरली आहे. ज्योतिरादित्य, जितीन प्रसाद व सुनील जाखड या तिघांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पित्यांपेक्षा मोठय़ा निघाल्या. काँग्रेस पक्ष त्या तुलनेत छोटा ठरल्याने तिघांनीही काँग्रेसचा त्याग केला. सध्या कॉंग्रेसला ज्या व्यक्तींची गरज आहे, अशा नेत्यांनी कॉंग्रेसल सोडल्याने मोठा चिंतेचा विषय ठरला आहे.
आज काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष नाही व उदयपूरच्या चिंतन शिबिरात त्यावर चर्चा झाली, पण नेतृत्वाचा प्रश्न अधांतरी ठेवून चिंतन शिबीर संपवले गेले.