“महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंची नवी बाजीरावी!”, आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्यावर सामनातून टीकास्त्र

शिंदेगटातील आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्यावर सामनातून टीकास्त्र

महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंची नवी बाजीरावी!, आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्यावर सामनातून टीकास्त्र
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 8:17 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Cm Ekanath Shinde) आणि आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्यावर आजच्या सामनातून टीका करण्यात आली आहे. तसंच महाराष्ट्रात शिंदेंची नवी बाजीरावी सुरु असल्याचं म्हणण्यात आलं आहे. “कामाख्या देवीची यात्रा करून मुख्यमंत्री व त्यांच्या गटाचे आमदार परतले. जनावरांचे बळी देऊन नवस फेडण्यासाठी ते गेले होते हे आता जगजाहीर आहे. तो नवस काही महाराष्ट्राच्या कल्याणासाठी नव्हता. फुटलेल्या चाळीस आमदारांची मर्जी सांभाळणे एवढेच काम मुख्यमंत्र्यांकडे दिसते. बाकी राज्यात नव्या ‘बाजीरावी’चेच चित्र दिसत आहे”, असं सामनात (Saamana Editorial) म्हणण्यात आलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या शे-पाचशे लोकांसह आसाममधील कामाख्या देवीचे दर्शन करून आले. विमान व्यवस्था, लॉजिंग बोर्डिंगची व्यवस्था चोख असल्यामुळे आमदारांशिवाय इतर लोकही गेले. तीर्थयात्रा हेच राज्य सरकारचे मुख्य कार्य झाले आहे. हा विषय फक्त श्रद्धा आणि दर्शनापुरता मर्यादित राहिला नाही. मुख्यमंत्र्यांच्या तीर्थयात्रेत त्यांच्या गटाचे चाळीस आमदारही होते व ते सर्व नवस फेडण्यासाठी आसामला गेले. नवस फेडण्यासाठी या सर्व लोकांनी प्राण्यांचे बळी दिले व त्याचे समर्थन महाराष्ट्र विधानसभेचे सन्माननीय सदस्य करतात हे राज्याच्या परंपरेला साजेसे नाही, असं म्हणत शिंदेगटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर सामनातून टीका करण्यात आली आहे.

यात्रेने प्रश्न सुटतील? आसामातील तीर्थयात्रेने महाराष्ट्रापुढील प्रश्नांचे निर्दालन होणार आहे काय? ते महत्त्वाचे. आधी प्रश्न कोणते ते पहा… राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांचा सरळ अपमान केला. तरीही ते राज्यपालपदावर चिकटून आहेत. राज्यपालांचे काय करायचे? याबाबत सरकारने देवीला विचारणा केली काय? कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रातील दोन जिल्हय़ांवर दावाच सांगितला. बेळगाव-कारवार-निपाणीसह मराठी सीमा भाग राहिला बाजूला, उलट आणखी दोन जिल्हेही आमचेच, असे बरळणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध जनता संतापली, पण राज्यकर्ते थंड आहेत, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.