AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेरीज, कूटनीती आणि किरकोळ गोष्टी… दोन वांझ भाषणे!; शिंदे-फडणवीसांवर सामनातून थेट निशाणा

Saamana Editorial on CM Eknath Shinde Devendra Fadnavis : व्यभिचाऱ्यांची मोट बांधून त्यास कूटनीती, बेरजेचे राजकारण वगैरे मुलामा देणे हे राजकारण नसून एक राष्ट्रीय संकट आहे!; सामनातून भाजप-शिंदेगटावर टीकास्त्र

बेरीज, कूटनीती आणि किरकोळ गोष्टी... दोन वांझ भाषणे!; शिंदे-फडणवीसांवर सामनातून थेट निशाणा
| Updated on: Jul 15, 2023 | 7:38 AM
Share

मुंबई 15 जुलै 2023 : सध्याची राजकीय परिस्थिती प्रत्येक दिवशी बदलती आहे. या बदल्या समिकरणांवर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. ‘बेरीज, कूटनीती आणि किरकोळ गोष्टी… दोन वांझ भाषणे!’, या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधण्यात आला आहे.

सामनाचा अग्रलेख जसाचा तसा

आयुष्यभर ज्या संस्थेत, ज्या नेत्यांबरोबर राहिलो तिला क्षणात सोडणे हा व्यभिचार आहे, पण अशा व्यभिचाऱ्यांची मोट बांधून त्यास कूटनीती, बेरजेचे राजकारण वगैरे मुलामा देणे हे राजकारण नसून एक राष्ट्रीय संकट आहे.

देवेंद्र फडणवीस आता याच कूटनीती आणि धर्म-अधर्माची भाषा करू लागले आहेत. पण ते व्यभिचार करणाऱ्यांच्या संगतीत आहेत. तिकडे मुख्यमंत्री शिंदेही आपल्या मिंध्या कार्यकर्त्यांना म्हणाले, राष्ट्रवादीचे सोबत येणे हे बेरजेचे राजकारण आहे. माणसाला गजकर्ण झाले की अशा बेरजा सुचतात. ‘थुंकलेले चाटणे’ असा एक वाक्प्रचार आपल्याकडे प्रचलित आहे. बेरजेचे राजकारण वगैरे वल्गना करणाऱ्यांनी त्याचा अर्थ समजून घ्यावा.

देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याला एकेकाळी महाराष्ट्रात वजन होते. त्यांचे बोलणे काही प्रमाणात गांभीर्याने घेतले जात होते. त्यांचे चित्त तेव्हा स्थिर होते. मनही शांत होते, पण 2019 सालापासून त्यांची मनःशांती, संयम वगैरे साफ ढळला आहे. ठाणे जिल्हय़ात काल दोन भाषणे झाली. दोन्ही भाषणांत ढोंग व खोटेपणाचा ‘कूट’ होता. त्यातील एक भाषण श्री. फडणवीस यांचे होते.

फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितले की, ‘सध्या राष्ट्रवादी काँग्रेसशी म्हणजे अजित पवार गटाशी झालेली युती ही कूटनीती आहे, अधर्म नव्हे.’ भगवान श्रीकृष्णासारखी कूटनीती राजकारणात वापरावी लागते, असे फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस यांना झाले आहे तरी काय? मुख्यमंत्री मिंधे यांच्या संगतीत आल्यापासून त्यांनी सत्य व नीतिमत्तेची कास सोडली आहे. त्यांना जुने काही आठवत नाही असेच एकंदरीत दिसत आहे.

देवेंद्र फडणवीस आता याच कूटनीती आणि धर्म-अधर्माची भाषा करू लागले आहेत, पण ते व्यभिचार करणाऱ्यांच्या संगतीत आहेत. म्हणजे अधर्माच्या चिखलात आहेत याची जाणीव त्यांना आहे. फडणवीसांनी ‘धर्मवीर’ अमितभाई शहांचा हवाला देऊन कार्यकर्त्यांना सांगितले की, ‘ते मला म्हणाले, देवेंद्र, राजकारणात 10 वेळा अपमान सहन कर, पण बेइमानी खपवून घेऊ नको.’ मुळात देशात गेल्या 8-9 वर्षांत ‘इमान’ नावाची चीज गुंजभर तरी उरली आहे काय? इमानाचे पानिपत दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत रोजच चालू आहे.

‘हम छेडते नही, छेडा तो छोडते नही.’ असा शेर श्री. फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर मारला व टाळय़ा मिळवल्या. तुम्ही टाळय़ा मिळवा किंवा टाळ कुटा, पण राजकारण सत्य व धर्माचे करा. ईडी, सी.बी.आय. वगैरे चिलखते बाजूला करा व नंतर ही असली संवादफेक करा. मग तुम्हाला अधर्म, कूटनीती, छेडणे वगैरेचे प्रत्यंतर खऱ्या अर्थाने येईल.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.