काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद पाच वर्षांसाठी, एका वर्षात राजीनामा देऊन निवडणुकांसाठी नाही : सामना

आघाडी सरकारच्या काळात अशा घटनात्मक पदांसाठी शक्यतो पुन्हा पुन्हा निवडणुका टाळणे सगळ्यांच्याच हिताचे ठरत असते, असंही अग्रलेखात म्हटलं आहे. (Saamana Nana Patole Assembly Speaker)

काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद पाच वर्षांसाठी, एका वर्षात राजीनामा देऊन निवडणुकांसाठी नाही : सामना
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 7:54 AM

मुंबई : काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद पाच वर्षासाठी दिलं. फक्त एका वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही, अशा शब्दात ‘सामना’च्या अग्रलेखातून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आलं आहे. काँग्रेसने त्यांचा पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचाच अधिकार, पण सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही, यासाठी सावधान राहावे लागेल, असंही सामनाच्या अग्रलेखात सुचवलं आहे. (Saamana Editorial on Congress State President Nana Patole Assembly Speaker Election)

“निवडणुका टाळणे सगळ्यांच्याच हिताचे”

आघाडी सरकारच्या काळात अशा घटनात्मक पदांसाठी शक्यतो पुन्हा पुन्हा निवडणुका टाळणे सगळ्यांच्याच हिताचे ठरत असते, असंही अग्रलेखात म्हटलं आहे. काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळत आहे, त्याच बरोबर विधानसभेला नवा अध्यक्ष मिळेल. नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षपदावरुन गेले, पण काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राज्याच्या मुख्य प्रवाहात परत आले. म्हणजे नाना गेले, नाना आले, असं म्हणत पटोलेंना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

नाना पटोले यांच्यासोबत महाराष्ट्रासाठी टीम काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर झाली. नाना हे प्रांतिक अध्यक्ष झाले, पण त्यांना विभागानुसार नेमलेल्या कार्याध्यक्षांना घेऊन काम करावे लागेल. काँग्रेसने त्यांच्या कार्याची नवी पद्धत स्वीकारली आहे, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

बाळासाहेब थोरातांचे कौतुक

दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था अशी झाली होती, की राज्यात काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारायला कोणी तयार नव्हते. अशावेळी बाळासाहेब थोरातांनी जबाबदारी स्वीकारुन अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवले, अशा शब्दात थोरातांचे कौतुक करण्यात आले आहे. निदान महाराष्ट्रात तरी काँग्रेसची सुकलेली मुळे बहरु लागली आहेत, असंही अग्रलेखात म्हटलं आहे. (Saamana Editorial on Congress State President Nana Patole Assembly Speaker Election)

“आक्रमण म्हणजे अतिरेक ठरु नये”

विधानसभा अध्यक्षपदावरुन नानांना मोकळे केले आणि त्यांच्यावर पक्ष संघटनेची धुरा सोपवली गेली आहे, त्याचा अर्थ असा की महाराष्ट्रात काँग्रेसला आक्रमक चेहरा हवा आहे. अर्थात आक्रमण म्हणजे अतिरेक ठरु नये, याचा विचारही काँग्रेसने केला असेल. फटकळपणा ही नाना पटोलेंची ताकद आहे, अशा शब्दात नानांचं कौतुक केलं आहे.

संबंधित बातम्या :

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंना ना ना? अमित देशमुखांचं नाव चर्चेत, काय घडतंय पडद्याआड?

नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज?

(Saamana Editorial on Congress State President Nana Patole Assembly Speaker Election)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.