AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ तीन प्रश्नांवर तोडगा नाही, देश चालतो कसा?; सामनातून ‘रोखठोक’ सवाल

Saamana Editorial on PM Narendra Modi : 'ते' तीन प्रश्न, तोडगा अन् केंद्र सरकारला सवाल; आजच्या सामना अग्रलेखात नेमकं काय?

'या' तीन प्रश्नांवर तोडगा नाही, देश चालतो कसा?; सामनातून 'रोखठोक' सवाल
| Updated on: Jun 18, 2023 | 7:57 AM
Share

मुंबई : सामनाच्या रविवारच्या रोखठोक या सदरातून सवाल विचारण्यात आलाय. राज्य कसे चालले आहे? याचे उत्तर आज कुणीच देऊ शकत नाही. मणिपूरची आग विझवता येत नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी ट्विटरवर दबाव आणला गेला. राज्यकर्त्यांच्या ‘आरामगिरी’वर कोटयवधी उधळले जात आहेत. चीनने सीमेवर विमानतळ उभे केले, पण राज्य चालवणारे गप्प आहेत!, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागातून रोजच्या रोज ज्या तणावाच्या आणि हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत त्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. मणिपूरसारखे राज्य पेटलेलेच आहे. आतापर्यंत शेकडो घरे, गाडय़ा, व्यवसाय भस्मसात झाले व पाचशेच्या आसपास लोक त्या हिंसेत मरण पावले. पंजाब आणि कश्मीरप्रमाणे मणिपूरचा प्रश्न चिघळत चालला आहे व गृहमंत्री अमित शहा निवडणुकांच्या राजकारणात स्वतःला गुंतवून घेत आहेत.

मणिपूरसारख्या लहान राज्यात गृहमंत्री शांतता प्रस्थापित करू शकले नाहीत. मणिपूरमध्ये वर्गकलहाने हिंसाचाराचा उद्रेक झाला व हे राज्य तुटेल असे चित्र आहे. पंतप्रधान मोदी ‘पोन-रशियाच्या युद्धात मध्यस्थी करू शकतात (असे भक्त सांगतात), पण मणिपूरमधील दोन जमातींमधला कलह सोडवू शकत नाहीत. हे चित्र चांगले नाही, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

मोदी-शहांचे राज्य नेमके कसे चालले आहे? याचा खुलासा ‘ट्विटर’चे माजी ‘सीईओ’ जॅक डोर्सी यांनी केला आहे. सरकारविरोधी भूमिकांना ‘ट्विटर’वर स्थान देऊ नका, असा दबाव असल्याचा स्फोट डोर्सी यांनी केला.

भारत सरकारने शेतकरी आंदोलनादरम्यान दबाव आणला होता की, आंदोलनासंदर्भातल्या बातम्या व भूमिकांना स्थान देऊ नका. आमचे ऐकले नाहीत तर भारतातील ‘ट्विटर’ कार्यालय बंद पाडू व तुमच्या कर्मचाऱ्यांवर धाडी घालू.” डोर्सी खोटे बोलत आहेत असा कांगावा आता केंद्राचे एक मंत्री चंद्रशेखर करीत आहेत. जॅक डोर्सी यांना खोटे बोलण्याचे तसे काहीच कारण नाही. पण खोटे बोलावे, सत्य दडपावे यासाठी मोदी सरकारकडे भरपूर कारणे आहेत. या देशाचे सध्याचे राज्यकर्ते किती डरपोक आहेत हे या प्रकरणातून स्पष्ट होते. हुकूमशहा हा डरपोकच असतो. चार गाढवे एकत्र चरत असली की हुकूमशहाला त्या चार गाढवांची भीती वाटू लागते. ही चार गाढवे आपल्या विरोधात काही कारस्थाने तर करीत नसतील ना? या चिंतेने तो अस्वस्थ होतो. आपल्या देशात नेमके तेच सुरू आहे, असं म्हणत जॅक डोर्सी यांच्या वक्तव्यावर रोखठोकमधून भाष्य करण्यात आलं आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.