Saamana: गवळी-मोदींचं रक्षाबंधन,ईडी, सैन्य, डागी नेते अन् करेक्ट कार्यक्रम!, अथेन्स नगरी, चौपट दिल्ली म्हणत सामनाच्या पानभर अग्रलेखातून भाजप-शिंदे गटाचा समाचार

'अथेन्स नगरी, चौपट दिल्ली' या शीर्षकाखाली सामनाचा अग्रलेख लिहिण्यात आलाय. पूर्ण पानभरून असलेल्या या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर शब्दात निशाणा साधलाय.

Saamana: गवळी-मोदींचं रक्षाबंधन,ईडी, सैन्य, डागी नेते अन् करेक्ट कार्यक्रम!, अथेन्स नगरी, चौपट दिल्ली म्हणत सामनाच्या पानभर अग्रलेखातून भाजप-शिंदे गटाचा समाचार
नरेंद्र मोदी,उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 7:52 AM

मुंबई : आजच्या सामनाचा अग्रलेख (Saamana Editorial) विशेष आहे. ‘अथेन्स नगरी, चौपट दिल्ली’ या शीर्षकाखाली हा अग्रलेख लिहिण्यात आलाय. पूर्ण पानभरून असलेल्या या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर शब्दात निशाणा साधलाय. भावना गवळी (Bhavana Gavali) यांनी रक्षाबंधनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली. त्यावरही निशाणा साधण्यात आलाय. ईडी, सैन्य, डागी नेते अन् करेक्ट कार्यक्रम! या सगळ्यावरच सामनात भाष्य करण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडून लोकांना आजही अपेक्षा आहेत, पण संभ्रम असा की, कोणते मोदी खरे? लाल किल्ल्यावरून भ्रष्टाचार संपूर्ण मिटविण्याची गर्जना करणारे मोदी खरे, की कालपर्यंत ज्यांच्यावर ‘ईडी’ कारवाईचे भय होते व त्या भयाने भूमिगत झालेल्या खासदार भावनाताईंचे रक्षाबंधन करून घेणारे मोदी खरे ? भाजपने तरी यावर प्रकाशझोत टाकावा”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

भावना गवळी- नरेंद्र मोदींचं रक्षाबंधन

भावना गवळी यांनी पंतप्रधान मोदी यांना राखी बांधली यात आक्षेप घ्यावे असे काहीच नाही. श्री. मोदी यांनी त्या पवित्र दिवशी अनेक शाळकरी विद्यार्थिनींकडून प्रेमाने रक्षाबंधन केले. पंडित नेहरूदेखील असे रक्षाबंधन करीत होते. पंतप्रधान हा देशातील भगिनींचा रक्षणकर्ताच असतो, पण भावना गवळी संकटात असताना भाजपातील एकही ‘भाऊ’ त्यांच्या मदतीस धावला नाही. म्हणजे एक तर भावना गवळी व त्यांच्या लोकांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले व आता ‘वॉशिंग मशीन’ मध्ये प्रवेश करताना त्यांची सर्व प्रकरणे स्वच्छ झाली व त्यांना पंतप्रधान भेटीचा लाभ मिळाला! हे आश्चर्यकारक आहे.

आता भावनाताई एकदम मस्त आहेत. किरीट सोमय्यांनी भावनाताई श्री. मोदींना राखी बांधत आहेत या फोटोचे लॉकेट करून आपल्या गळ्यात बांधले आहे. यशवंत जाधव, प्रताप सरनाईक, राहुल शेवाळे यांच्या फोटोंची लॉकेटस् त्यांनी सोनाराकडे बनवायला दिली आहेत. प्रश्न इतकाच आहे की, नक्की कोणते मोदी खरे? भ्रष्टाचार सहन करणार नाही, असे देशाला लाल किल्ल्यावरून वचन देणारे मोदी खरे, की भावनाताईकडून आदरपूर्वक राखी बांधून ‘संरक्षणा’ची हमी देणारे मोदी खरे ?

हे सुद्धा वाचा

डागी कोण?

बिहारात नितीश कुमारांनी भाजपास दूर करून राष्ट्रीय जनता दलाबरोबर सरकार स्थापन केले. त्याबरोबर भाजपमधील सत्य व प्रामाणिकपणाचा अंश जागा झाला व नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळात कसे गुन्हेगारी स्वरूपाचे लोक आहेत यावर ते प्रकाशझोत सोडू लागले. भारतीय जनता पक्षाचे 152 खासदार या ना त्या गुन्हय़ांमुळे ‘डागी’ आहेत हे ते विसरले. बिहारच्या कायदामंत्र्यावर ‘वॉरंट’ आहे म्हणून धोपटाधोपटी सुरू आहे. या कायदामंत्र्यांनी पलटी मारून भाजपच्या मनगटास राखी बांधली तर त्या ‘वॉरंट’च्या कागदाचे गुलाबी प्रेमपत्रात रूपांतर होईल. भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे हे अत्यंत सचोटींचे गृहस्थ आहेत. त्यांना मंत्री केले नाही, पण आता महाराष्ट्राचे अध्यक्ष केले. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बावनकुळे हे ऊर्जामंत्री असतानाही त्यांचे तिकीट कापले गेले होते! यावर कोणी प्रकाशझोत टाकेल काय ? आजचे कर्तबगार, मेहनती, निष्ठावान बावनकुळेंना तेव्हा तडकाफडकी दूर का लोटले, हेसुद्धा भावनाताईंच्या रक्षाबंधनाप्रमाणे मोठेच गौडबंगाल आहे. अशी अनेक गौडबंगाले व रक्षाबंधने नजीकच्या काळात होत राहतील, पण सामान्य माणसाच्या मनातला प्रश्न कायम राहील. कोणते मोदी खरे ? लाल किल्ल्यावर तिरंगा फेटा घालून भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे, की ‘या भावनाताई’ अशा बंधुप्रेमाची साद घालणारे? पंतप्रधान मोदी यांची कोणीतरी फसवणूक करतेय.

करेक्ट कार्यक्रम

महाराष्ट्रातील खोकेबाज आमदारांचे भवितव्य न्यायालयाच्या हातात आहे. खरे तर महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकार व दलबदलू आमदारांवर तत्काळ निकाल अपेक्षित होता व निकाल लागताच लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांनी दलबदलूंच्या राजकीय भ्रष्टाचारावर प्रहार करायला हवे होते. पण तसे होताना दिसत नाही. भारतीय राजकारण व समाजजीवनात स्वच्छ राजकारणी म्हणून, एक श्रेष्ठ पुरुष म्हणून मोदींची प्रतिमा इतिहासात टिकावी असे वाटते, पण राजकीय विरोधकांवर पेंद्रीय तपास यंत्रणेचा झाडू आणि भावनाताई, यशवंत दादांच्या तोंडी शुद्ध तुपातला लाडू असा एपंदरीत करेक्ट कार्यक्रम सुरू आहे. बिहारचे सरकार घेरण्याची रणनीतीदेखील स्पष्ट दिसतेय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.