Uddhav Thackeray Interview | शरद पवारांनंतर आता संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंशी ‘सामना’
शरद पवार यांच्या मॅरेथॉन मुलाखती पाठोपाठ आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'सामना'त मुलाखत घेण्यात आली आहे.
मुंबई : महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Saamana Uddhav Thackeray Interview) यांच्या मॅरेथॉन मुलाखती पाठोपाठ आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘सामना’त मुलाखत घेण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली (Saamana Uddhav Thackeray Interview).
या मुलाखतीचे चित्रीकरण आज (20 जुलै) पार पडले. राज्य ते केंद्र, अगदी राम मंदिर निर्माणाचा मुद्दा, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ते कोरोना प्रादुर्भाव, महाविकास आघाडीचे नेतृत्व ते सरकारचे स्थैर्य अशा प्रत्येक विषयांवर उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत भूमिका त्यांची मांडली.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
येत्या शनिवार (25 जुलै)-रविवार (26 जुलै) शिवसेनेचे मुखपत्र असलेले ‘सामना’ आणि न्यूज चॅनलवर या मुलाखतीचे प्रक्षेपण होणार आहे. 27 जुलैला उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्याचं औचित्य साधत संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली.
शरद पवारांची मॅरेथॉन बैठक
यापूर्वी संजय राऊतांनी शरद पवार यांची मॅरेथॉन बैठक घेतली. यात त्यांनी शरद पवार यांना कोरोनापासून आघाडी सरकार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटासह अनेक प्रश्न विचारले होते. यावर शरद पवार यांनी रोखठोक उत्तरं दिली.
Sharad Pawar Saamana Interview | जेव्हा चिनी संरक्षण मंत्र्यांनी शरद पवारांना अज्ञातस्थळी नेले होते… https://t.co/AVwVGLtBeV @PawarSpeaks @rautsanjay61 #SharadPawar #Saamana #China
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 12, 2020
आता उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत कुठले गौप्यस्फोट केले असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Saamana Uddhav Thackeray Interview
संबंधित बातम्या :