AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saamana : उद्धव ठाकरेंनी फणस सोलावा तसे विरोधकांना सोलून काढले, सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांसह विरोधकरांवरती टीका

शनिवारी मुख्यमंत्र्यांची सभा विराट झाली. शिवसेनेच्या सभेची आत्तापर्यंत आकडीमोड कुणाला जमलेली नाही. परवा झालेल्या बीकेसीतील सभेचं एक टोक बांद्रा तर एक टोक कुर्ला असं होतं. मुख्यमंत्र्यांची सभा पाहून विरोधकांची झोप नक्की उडाली असेल.

Saamana : उद्धव ठाकरेंनी फणस सोलावा तसे विरोधकांना सोलून काढले, सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांसह विरोधकरांवरती टीका
उद्धव ठाकरेंनी फणस सोलावा तसे विरोधकांना सोलून काढलेImage Credit source: twitter
| Updated on: May 16, 2022 | 7:55 AM
Share

मुंबई : “भाजपचे (BJP) पुढारी देशभरात इतरांना ‘बुस्टर’ डोस देत फिरत असतात, पण मुंबईतील शिवसेनेच्या (Shivsena)सभेने या मंडळींना जहाल बुस्टर डोस देऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्राचा बाणा दाखवून दिला. मुंबई स्वतंत्र करण्याची भाषा मधल्या काळात फडणवीसादी नेत्यांनी केली. शिवसेना व मराठी माणूस भाजपचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, अशी हाळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. अंगावर येऊ नका, दिल्लीतील सत्तेचा माज दाखवू नका, असा इशारा ठाकरे यांनी देऊनं भाजपला व त्यांच्या बगलबच्च्यांना पायाखाली घेतले आहे. शिवसेनेला कमी लेखण्याचे व खाली खेचण्याचे धाडस अंगलट येईल, हाच शिवसेनेच्या वादळी सभेचा इशारा आहे!” असं आजच्या सामनाच्या (Saamana) अग्रलेखात म्हटलं आहे.

शिवसेनेच्या सभेची आत्तापर्यंत आकडीमोड कुणाला जमलेली नाही.

शनिवारी मुख्यमंत्र्यांची सभा विराट झाली. शिवसेनेच्या सभेची आत्तापर्यंत आकडीमोड कुणाला जमलेली नाही. परवा झालेल्या बीकेसीतील सभेचं एक टोक बांद्रा तर एक टोक कुर्ला असं होतं. मुख्यमंत्र्यांची सभा पाहून विरोधकांची झोप नक्की उडाली असेल. तसेच विरोधी पक्षातील पंडीतांची वाचा देखील गेली असेल. सभेचं विशेष म्हणजे लाखो लोक बाहेर होते. तेवढेचं लोक सभेत होते. शिवसेना पूर्वीची राहिली नाही, असा अपप्रचार करणाऱ्यांच्या जिभा हा महासागर पाहून टाळूलाच चिकटल्या असतील. शिवसेना म्हणजे सदैव गरम रक्ताची उसळणारी पिढीच आहे अशी विरोधकांवरती केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी फणस सोलावा तसे विरोधकांना सोलून काढले

देवेंद्र फडणवीस झालेल्या सभेला ‘टोमणे सभा’, ‘टोमणे बॉम्ब’ अशीच करत आहेत. ते म्हणत आहेत ते एकवेळ ते खरे मानू. ठाकऱ्यांचे फक्त ‘टोमणे’च असे भारी असतील तर प्रत्यक्ष घाव, फटके व हल्ले किती भयंकर असतील? उद्धव ठाकरे यांनी फणस सोलावा तसे विरोधकांना सोलून काढले आहे अशी टीका देवेंद्र फडणवीसांसह विरोधकरांवरती केली आहे.

काश्मीरात पुन्हा पंडितांवर हल्ले सुरू झालेत

कश्मीरात सध्या हिंदू पंडितांवरच नव्हे, तर देशभक्त नागरिकांवर अतिरेक्यांचे अमानुष हल्ले पुन्हा सुरू झाले आहेत. राहुल भट्ट या कश्मिरी पंडित तरुणावर काही दहशतवाद्यांनी कार्यालयात घुसून ठार मारले.

त्यामुळे कश्मीरातील हिंदू समाज रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतच आहे. काश्मिरच्या पोलिसांनी हिंदूवर अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. हिंदू समाजाने मोदी व शहांच्या विरोधात घोषणा दिल्या आहेत.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.