‘चित मैं जिता पट तू हारा’ ही भाजपची भूमिका; विरोधकांच्या ‘त्या’ आरोपानंतर काँग्रेसचा पलटवार

"भाजपची ही भूमिका म्हणजे, चित मैं जिता पट तू हारा, अशी आहे," असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत यांनी भाजपला लगावला. (sachin sawant bjp kishor wagh acb)

'चित मैं जिता पट तू हारा' ही भाजपची भूमिका; विरोधकांच्या 'त्या' आरोपानंतर काँग्रेसचा पलटवार
सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 10:58 AM

मुंबई :भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचे पती किशोर वाघ (Kishor Wagh) यांच्यावर दाखल झालेला गुन्हा अयोग्य; आणि क्लिन चिट देऊनही राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) मागे लावलेली ईडीची चौकशी योग्य. भाजपची ही भूमिका म्हणजे, चित मैं जिता पट तू हारा, अशी आहे,” असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत (Sachin Sawant) यांनी लगावला. (Sachin sawant criticizes bjp on kishor wagh case filed by acb)

सचिन सांवत यांचे ट्विट काय?

“भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांची चौकशी तत्कालीन फडणीस सरकारने सुरु केली. त्यानंतर आता त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा म्हणजे सूडूबुद्धी. मात्र, क्लिन चिट देऊनही राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या मागे मोदी सरकारने ईडीची चौकशी लावली हे योग्य, भाजपची ही भूमिका म्हणजे चित मैं जिता पट तू हारा, अशी आहे.” असे ट्विट सचिन सावंत यांनी केले.

किशोर वाघ यांच्यावरील कारवाई सूडबुद्धीने

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मागील काही दिवसांपासून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी भूमिका घेत सरकारवर दबाव टाकला होता. याच दरम्यान चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला. या कारणामुळे चित्रा वाघ यांच्या पतींवर सूडबुद्धाने कारवाई होत असल्याचा आरोप भाजपने केला. भाजपच्या या दाव्याने राज्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत होत्या. सरकारने भाजपच्या या दाव्याला फेटाळून लावले होते. त्यानंतर सावंत यांनी ही वरील ट्विट करत भाजपला पुन्हा धारेवर धरले.

चित्रा वाघ यांच्या पतींवर गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?

किशोर वाघ हे मुंबईच्या परेल येथील गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते. 5 जुलै 2016 रोजी एका प्रकरणात त्यांना चार लाख रुपयांची लाच घेताना अटक झाली होती. त्यानंतर किशोर वाघ यांना निलंबित करण्यात आले होते.

या प्रकरणात फडणवीस सरकारच्या काळात किशोर वाघ यांच्या 1 डिसेंबर 2006 ते 5 जुलै 2016 या काळातील त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात आली होती. यामध्ये कायदेशीर उत्पन्न, गुंतवणूक, ठेवी, खात्यावरील रकमेची आवक जावक , वारसाहक्काची मालमत्ता, खर्च या गोष्टींची तपासणी करण्यात आली होती.

तपासात किशोर वाघ यांच्याकडे 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेची अपसंपदा आढळून आली होती. किशोर वाघ यांच्याकडे असणारी एकूण अपसंपदा एकूण उत्पन्नाच्या सुमारे 90 टक्के इतके होती. या खुल्या चौकशीच्या अहवालानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नवनाथ जगताप यांच्या तक्रारीवरून किशोर वाघ यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये 13(2) आणि 13(1) ई या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणामुळे 2019 मध्ये चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा तेव्हा रंगली होती.

इतर बातम्या :

चित्रा वाघ यांचा संजय राठोडांसोबत मॉर्फ फोटो, आक्षेपार्ह फोटोवरुन मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे तक्रार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.