Sachin Vaze Case : एटीएसने जप्त केलेली व्हॉल्वो फडणवीसांच्या गुडबुक्समधल्या बिल्डरची!, राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

जप्त करण्यात आलेली व्हॉल्वो कार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुक्समधल्या एका बिल्डरची असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.

Sachin Vaze Case : एटीएसने जप्त केलेली व्हॉल्वो फडणवीसांच्या गुडबुक्समधल्या बिल्डरची!, राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
एटीएसने जप्त केलेली व्हॉल्वो कार ही देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या बिल्डरची असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 3:50 PM

मुंबई : सचिन वाझे प्रकरणात एटीएसने अजून एक महागडी कार जप्त केली आहे. ही व्हॉल्वो कार थेट दमणमधून जप्त करण्यात आली आहे. ही गाडी सचिन वाझे याच्या बिझनेस पार्टनरची असल्याचं सांगण्यात येत आहे. एटीएस आणि फॉरेन्सिक टीमकडून या कारची तपासणी करण्यात येत आहे. अशावेळी जप्त करण्यात आलेली व्हॉल्वो कार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुक्समधल्या एका बिल्डरची असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. तशी फेसबुक पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत पेजवरुन करण्यात आली आहे.(NCP alleges that Volvo car seized by ATS belongs to builder close to Devendra Fadnavis)

राष्ट्रवादी काँग्रेसची फेसबुक पोस्ट

एटीएसच्या तपासामुळे कहानी में ट्विस्ट! महाराष्ट्र एटीएसने जप्त केलेली व्होल्वो मनिष भतिजांची? मनिष भतिजा देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुक्समधले बिल्डर. मनसुख हिरेन तपासात महाराष्ट्र एटीएसच्या नव्या सुगाव्यामुळे कहानी में ट्विस्ट आला आहे. एटीएसने तपासादरम्यान जी व्होल्वो कार ताब्यात घेतली आहे, ती बिल्डर मनिष भतिजा यांची असल्याचे समजते. मनिष भतिजा यांचे राजकीय व व्यावसायिक लागेबांधे भाजपा नेत्यांकडे जातात.

‘मनिष भतिजा प्रसाद लाड यांचे व्यावसायिक पार्टनर’

याच मनिष भतिजा यांच्या पॅराडाइज ग्रुपला फडणवीस मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळानजीकची सोन्यासारखी 24 एकर प्राइम लँड पडेल भावाने दिली होती. इतका हा मनिष भतिजा फडणवीसांच्या जवळचा आहे आणि फडणवीसांचे अत्यंत लाडके ज्यांना त्यांचा ब्लू आइड बॉय म्हणून ओळखले जाते, त्या प्रसाद लाड यांचे हे मनिष भतिजा व्यावसायिक पार्टनर असल्याचे समजते.

एटीएसच्या तपासामुळे कहानी में ट्विस्ट महाराष्ट्र एटीएसने जप्त केलेली व्होल्वो मनिष भतिजांची? मनिष भतिजा देवेंद्र…

Posted by Nationalist Congress Party – NCP on Tuesday, 23 March 2021

‘पोलीस तपासात वेगळी तथ्य समोर’

नवी मुंबईतील सुमारे 1767 कोटी रुपयांची ही जमीन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या 3.6 कोटी रुपयांत मनिष भतिजा यांच्या घशात घातली, असा आरोप सातत्याने झाला होता. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठीच खळबळ उडाली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माध्यमांमध्ये वेगवेगळ्या राजकीय भूमिका उठत असताना पोलिस तपासात मात्र वेगळी तथ्ये सामोरी येत आहेत. या प्रकरणातले इतर पुरावे आता महाराष्ट्र पोलिसांच्या तपासामुळे बोलू लागले आहेत. अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन करण्यात आली आहे.

चूर्ण सदृश्य बाटल्या आणि सॅनिटायझरचा कॅन

न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) टीमला वॉल्व्हो कारच्या डिकीमधून दोन बॅग सापडल्या आहेत. त्यामध्ये जीन्स आणि पांढरा शर्ट मिळाला आहे. त्या बरोबरच एक मास्क आणि मोबाईल चार्जरही आढळला आहे. एकूण तीन जोड कपडे आणि टॉवेल सापडले आहेत. गाडीच्या स्टेपनीच्या जागेत एका बॉक्समध्ये दोन चूर्ण सदृश्य बाटल्या, एक सॅनिटायझरचा कॅन मिळाला. गाडीत सापडलेल्या पाण्याच्या बाटल्यांवर बोटांचे ठसे चेक केले जात आहेत. गाडीत पायाखाली असलेल्या मॅट झटकून त्यावरची माती ताब्यात घेण्यात आली आहे. गाडीत अन्यत्र कुठेही बोटांचे ठसे आहेत का याचा शोध घेतला जात आहे.

व्हॉल्वो कार वाझेंच्या पार्टनरची?

दमण येथे सापडलेली ही कार सचिन वाझेंच्या पार्टनरची असल्याचं सूत्रांनी सांगितलं. एटीएसने दमण येथील एका फॅक्ट्रीत सोमवारी छापा मारला होता. तिथे त्यांना ही कार सापडली. दमणमध्ये सापडलेल्या या कारचा खरा मालक आणि वाझेंच्या दरम्यानच्या कनेक्शनचाही एटीएस शोध घेत आहे. तर दुसरीकडे मनसुख हिरेन प्रकरणात अटक करण्यात आलेला विनायक शिंदे हा अँटालिया स्फोटक प्रकरणातील एक आरोपी असल्याचं तपास यंत्रणेने स्पष्ट केलं आहे.

संबंधित बातम्या :

दमणला सापडलेल्या वाझेंच्या व्हॉल्वो कारची फॉरेन्सिक तपासणी; गाडीत जीन्स-शर्ट, चूर्ण सदृश्य बाटल्या आणि…

ट्रायडंट हॉटेलमध्ये सचिन वाझेंसोबत महिला, ‘त्या’ 5 बॅगांमध्ये काय; ‘एनआयए’कडून कसून चौकशी

(NCP alleges that Volvo car seized by ATS belongs to builder close to Devendra Fadnavis

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.