‘उद्धव ठाकरेंमध्ये वाघाचे एकही गुण नाहीत, खरा वाघ पाहायला अधिवेशनात येणार’, सदाभाऊ खोतांची खोचक टीका
कोरोना आला, मास्क लावा, घरात बसा आणि पळ काढा. याला वाघ म्हणत नाहीत. वाघ हा डरकाळ्या फोडत जात असतो. तुमच्यात वाघाचं एकही लक्षण नाही. प्रत्येकवेळी बिळात जाऊन बसता. आम्ही खरा वाघ पाहायला अधिवेशनात येणार आहेत, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. ते आज सांगलीच्या आटपाडीमध्ये बोलत होते.
सांगली : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर रयत क्रांती संघटनेते नेते आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी जोरदार टीका केलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब तुमच्यात वाघाचे एक गुणही नाहीत. प्रत्येकवेळी बिळात जाऊन बसता. आम्ही खरा वाघ बघण्यासाठी अधिवेशनात येणार आहोत, अशी खोचक टीका खोत यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता तरी जरा आपल्या महालातून बाहेर या आणि जनतेचे प्रश्न काय आहेत ते जाणून घ्या. कोरोना आला, मास्क लावा, घरात बसा आणि पळ काढा. याला वाघ म्हणत नाहीत. वाघ हा डरकाळ्या फोडत जात असतो. तुमच्यात वाघाचं एकही लक्षण नाही. प्रत्येकवेळी बिळात जाऊन बसता. आम्ही खरा वाघ पाहायला अधिवेशनात येणार आहेत, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. ते आज सांगलीच्या आटपाडीमध्ये बोलत होते.
‘शेतकरी, शेतमजूर, बारा बुलतेदारांचे प्रश्न, अधिवेशन पूर्णवेळ घ्या’
शेतकरी, शेतमजूर आणि बारा बलुतेदार यांचे अनेक प्रश्न राज्यात आहेत. त्यामुळे हे अधिवेशन पूर्ण झाले पाहिजे. पण हे सरकार अधिवेशनातून सातत्याने पळ काढत आहेत. संसदेचं अधिवेशन महिनाभर चालतं आणि राज्याचं पाच दिवस चालतं. यांना भीती वाटते की यांना भ्रष्टाचार बाहेर पडेल. अनेकांना मंत्रीमंडळातून बाहेर जावं लागेल. या भीतीपोटी ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन घेत नाहीत, असंही खोत म्हणाले.
हिवाळी अधिवेशन 5 दिवसांचं, फडणवीसांची टीका
राज्याचं हिवाळी अधिवेशन फक्त पाच दिवसांचं करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विमानातून प्रवास करण्यास मनाई करण्यात आल्याने यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच होणार आहे. शिवाय मार्चमध्ये विशेष बाब म्हणून नागपूरमध्ये अधिवेशन घेण्यात येणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तसंच पुरवणी मागण्या मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यावर केवळ एक दिवस चर्चा होणार आहे. चर्चेनंतर पुरवणी मागण्या पास करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हे अधिवेशन वाढवलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. त्याबाबतचा आग्रह आम्ही बैठकीत धरला. त्यावर 31 डिसेंबरसाठी लोक बाहेर जातात, त्यामुळे अधिवेशन आवरतं घेण्यात येत असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. आम्ही म्हटलं तीन दिवस ब्रेक घ्या आणि अधिवेशन घ्या. जानेवारीत आणखी चार-पाच दिवस अधिवेशन होऊ शकतं. पण या सरकारची ती मानसिकता अधिवेशन घ्यायची दिसत नाही. प्रश्नाला सामोरे जाण्याची तयारी दिसत नाही. परंतु, माझ्या आग्रहानंतर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचं आश्वासन दिलं आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं होतं.
इतर बातम्या :