Video : ‘राष्ट्रवादीने माझ्यावर हल्ल्यासाठी कुभांड रचलं’, सदाभाऊंनी हॉटेल उधारी प्रकरणाचं अख्खं प्लॅनिंग सांगितलं…

सदाभाऊ खोत, हॉटेलचं बिल आणि उधारी प्रकरण सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. यावर आता सदाभाऊ खोत यांनी मोठा खुलासा केला आहे.

Video : 'राष्ट्रवादीने माझ्यावर हल्ल्यासाठी कुभांड रचलं', सदाभाऊंनी हॉटेल उधारी प्रकरणाचं अख्खं प्लॅनिंग सांगितलं...
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 6:27 PM

मुंबई : सदाभाऊ खोत, हॉटेलचं बिल आणि उधारी प्रकरण सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. यावर आता सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मोठा खुलासा केला आहे. उधारी प्रकरण राष्ट्रवादीचा बनाव असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीने माझ्यावर हल्ल्याचा प्लॅन केला होता, असं सदाभाऊ म्हणालेत. पुढे त्यांनी अख्ख्या प्लॅन उलगडला.

सदाभाऊ काय म्हणाले?

थेट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला तर राष्ट्रवादीने सदाभाऊंवर हल्ला केला, अशी नाचक्की होईल. म्हणून मग त्यांनी प्लॅनिंग केलं. हॉटेल मालकाने माझ्याजवळ यायचं हॉटेलचं बिल राहिलंय म्हणून बोलत राहायचं. त्यात जर माझ्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली तर मग हल्ला करायचा असा राट्रवादीचा प्लॅन होता. पण त्यांचा प्लॅन सत्यात येऊ शकला नाही, असं म्हणत सदाभाऊंनी राष्ट्रवादीने आपल्यावर हल्ला करण्याचा प्लॅन केल्याचं सांगितलं.

हे सुद्धा वाचा

सदाभाऊ, हॉटेल आणि बिल

सदाभाऊ खोत सध्या एका व्हिडीओमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. सदाभाऊ सांगोला दौऱ्यावर असताना एका हॉटेल मालकाने त्यांचा ताफा अडवला आणि सगळ्यांसमोर त्याने 2014 मधील उधारीची मागणी सदाभाऊंकडे केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सदाभाऊ चपापले. मात्र, त्यांनी वेळ मारुन नेत तुझं काय असेल तर बघू म्हणून तिथून काढता पाय घेतला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाभाऊ खोत 2014 साली माढा लोकसभा मतदारसंघातून खासदारकीला उभे राहिले होते. त्यावेळी माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सांगोला तालुक्यात प्रचारासाठी त्यांचे कार्यकर्ते होते. त्या कार्यकर्त्यांच्या जेवणाची सुविधा सांगोल्यातील मामा-भाचे या हॉटेलमध्ये करण्यात आली. सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांनी स्वतः येऊन हॉटेल मालक अशोक शिनगारे यांना कार्यकर्त्यांना जेवण द्यावे अशी विनंती केली. त्यानुसार अशोक शिनगारे यांनी 15 एप्रिल 2014 ते 10 मे 2014 पर्यंत कार्यकर्त्यांना जेवण दिलं. या 14 दिवसाच्या जेवणाचे एकूण बील 66 हजार 445 रुपये झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच बिलाची नोंद असलेलं एक रजिस्टरही शिनगारे यांनी दाखवलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.