‘विरोधात होता तेव्हा वीज बिलं माफ करा म्हणत होतात मग आता काय झालं?’, सदाभाऊ खोत यांचा उर्जामंत्र्यांना सवाल

'विरोधात होता तेव्हा वीज बिलं माफ करा म्हणत होतात मग आता काय झालं?', असा सवाल माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांना विचारला आहे.

'विरोधात होता तेव्हा वीज बिलं माफ करा म्हणत होतात मग आता काय झालं?', सदाभाऊ खोत यांचा उर्जामंत्र्यांना सवाल
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 3:25 PM

सांगली : लॉकडाऊन काळातील वीजबिले माफ होणार नाही किंबहुना वाढीव वीज बिलातून सवलत देणे अशक्य असल्याचं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. उर्जामंत्र्यांच्या भूमिकेवर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली आहे. “शेतकरी कामगाराचे कंबरडे मोडत चालले आहे मात्र तरीही गेंडयाच्या कातडीच्या सरकारला जाग कशी येत नाही?”, असा सवाल खोत यांनी विचारला आहे. (Sadabhau Khot Slam Energy Minister Nitin raut)

“कोरोना काळात शेतकरी आणि कामगारांची वीज बिलं 100 टक्के माफ करायला पाहिजे मात्रं गेंड्याची कातडं पांघरलेल्या राज्य सरकारला जाग यायला तयार नाही. विरोधात असताना शेतकरी कामगारांचा मोठा कळवळा आला होता मग आता सत्तेत आल्यावर काय झालं?”, असा सवाल खोत यांनी उर्जामंत्र्यांना विचारला आहे.

“तुम्ही विरोधी बाकावर बसला होता तेव्हा महापूर आणि दुष्काळाच्या काळात टाहो फोडून सांगत होतात की वीज बिलात सूट द्या किंबहुना माफी द्या आणि आता सत्तेत आल्यावर सांगता की वापरलेल्या विजेचे बील द्यावेच लागेल. तुमचं वागणं म्हणजे जनतेच्या मतांशी प्रतारणा आहे, असं टीकास्त्र खोत यांनी उर्जामंत्र्यांवर सोडलं.

लोकांनी वीज‌ वापरली त्याचे बिल भरावे, कुठलीही वीजबिल माफी (Electricity Bill) मिळणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) म्हणाले. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसणार आहे. कारण वाढीव वीज बिलातून सवलत देणे अशक्य असल्याचं नितीन राऊत यांनी यापूर्वीच म्हटलं होतं. त्याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला.

लॉकडाऊनकाळात वीज ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक बसला. आधीच अनेकांचे रोजगार गेले, त्यात वाढीव वीजबिले आल्याने सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले. (No electricity bills will be waived Said Nitin Raut). सरकारकडून वीजबिलांमध्ये सवलत मिळेल अशी आशा होती, मात्र आता ऊर्जामंत्र्यांनी सवलत मिळणार नसल्याचं स्पष्ट केल्याने, सर्वसामान्यांना शॉक बसला आहे.

“लॉकडाऊनमध्ये आलेली बिलं भरली पाहिजे. आम्ही पण ग्राहक आहोत. कर्ज घेऊन मदत करत आहोत, कामकाज चालवण्यासाठी आम्हालाही मर्यादा आहेत. वीज बिल सवलतीचा विषय आता नाही”, असं नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं.

तुम्ही जसे ग्राहक आहात तसं आम्ही सुद्धा वीज ग्राहक आहोत, आम्हाला सुद्धा वीजेचं बिल द्यावं लागतं. वापरापेक्षा वाढीव बिलं आली असतील त्याची चौकशी सुरु आहे. पण ज्यांनी वीज वापरली आहे त्यांना बिल भरावं लागेल असं नितीन राऊत म्हणाले.

(Sadabhau Khot Slam Energy Minister Nitin raut)

संबंधित बातम्या

कोणतीही वीज बिलं माफ होणार नाहीत; ऊर्जामंत्र्यांचा सामान्यांना शॉक

लॉकडाऊनमधील वाढीव वीज बिलात सवलत द्या, नाना पटोलेंचे सरकारला निर्देश

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.