वर्ध्यात तडस-मेघे वाद, सागर मेघेंची लोकसभेची तयारी

वर्धा: भाजपने वर्धा लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं, तर सागर मेघे लोकसभा लढतील, अशी घोषणा भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी दिली. यामुळे आता वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांचा पत्ता कट होणार का? अशी चर्चा जोरात सुरु झाली आहे. याच उमेदवारीच्या वादातून काही दिवसांपूर्वी खासदार तडस यांच्या समर्थकांनी दत्ता मेघेंचा पुतळा जाळण्याचा असा इशारा दिला होता. […]

वर्ध्यात तडस-मेघे वाद, सागर मेघेंची लोकसभेची तयारी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

वर्धा: भाजपने वर्धा लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं, तर सागर मेघे लोकसभा लढतील, अशी घोषणा भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी दिली. यामुळे आता वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांचा पत्ता कट होणार का? अशी चर्चा जोरात सुरु झाली आहे. याच उमेदवारीच्या वादातून काही दिवसांपूर्वी खासदार तडस यांच्या समर्थकांनी दत्ता मेघेंचा पुतळा जाळण्याचा असा इशारा दिला होता. यातूनच वर्धा लोकसभेत भाजपच्या उमेदवारीचा वाद पेटला आहे.

‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दत्ता मेघे यांनी सागर मेघे यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाने आदेश दिला तर सागर मेघे वर्धा लोकसभेतून निवडणूक लढवणार, अशी घोषणा त्यांनी केली.

दत्ता मेघे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. त्यामुळेच वर्धा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रामदास तडस यांचा पत्ता कट करुन सागर मेघे यांच्या उमेदवारीची शक्यता वर्तवली जात आहे.

वर्धा लोकसभा मतदार संघ?

काँग्रेसच्या गडाला खिंडार पाडत भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत वर्ध्याचा बालेकिल्ला हस्तगत केला होता. मात्र आता भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या चार प्रमुख राजकीय पक्षांनी 2019 च्या लोकसभा रणसंग्रामासाठी कंबर कसली आहे. पण वर्धा जिल्ह्यात अद्याप अस्तित्व नसलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून संपर्क आणि संगठन बांधणीत पुढाकार घेतला आहे. काही नेते गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत, तर काहींनी नुसतीच चर्चा करून वातावरण तयार करायला सुरुवात केली आहे.

भाजपच्या गोटात विद्यमान खासदार रामदास तडस यांची पकड घट्ट असली तरी दत्ता मेघे यांच्या कुटुंबातील सदस्य सागर मेघे (मेघे यांचा मुलगा, मागील निवडणुकीत काँग्रेसकडून लढले होते) तसेच पक्षातील नाराज असणारे मोठे नेते गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. काँग्रेसमध्ये प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस यांच्या नावाची चर्चा आहे.

लोकसभा निवडणूक 2014

उमेदवार   राजकीय पक्ष  मिळालेली मते    टक्के         

रामदास तडस  भाजप         537518             53.5

सागर मेघे        काँग्रेस         321735               31.75

चेतन पेंदाम     बसपा           90866                 8.97

संबंधित बातम्या

वर्धा लोकसभा : शेतकऱ्यांच्या रोषामुळे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागणार!   

ते नऊ लोकसभा मतदारसंघ, जिथे स्वाभिमानीला जिंकण्याचा विश्वास  

लोकसभेसाठी काँग्रेसच्या 9 उमेदवारांची नावं ठरली 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.