पवारांनी नाव सुचवलं, राहुल गांधींनी होकार दिला, काँग्रेसचा पुण्यातला उमेदवार ठरला!

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीत पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. काँग्रेसने या जागेसाठी उमेदवार आयात केला आहे. संभाजी ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष प्रवीण गायकवाड काँग्रेसच्या तिकिटावर पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे नाव सुचवलं होतं. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी हिरवा कंदील दाखवला. जातीय समीकरणे लक्षात घेत […]

पवारांनी नाव सुचवलं, राहुल गांधींनी होकार दिला, काँग्रेसचा पुण्यातला उमेदवार ठरला!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीत पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. काँग्रेसने या जागेसाठी उमेदवार आयात केला आहे. संभाजी ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष प्रवीण गायकवाड काँग्रेसच्या तिकिटावर पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे नाव सुचवलं होतं. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी हिरवा कंदील दाखवला.

जातीय समीकरणे लक्षात घेत काँग्रेसने प्रवीण गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. प्रवीण गायकवाड यांच्या जनसंपर्काचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा होईल, असा अंदाज लावला जात आहे. शिवाय मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जे वातावरण तापलं होतं, त्याचाही राष्ट्रवादी-काँग्रेसकडून फायदा घेतला जाऊ शकतो.

काँग्रेसकडून पुण्यात विविध नावांवर चर्चा सुरु होती. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेही काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यासाठी इच्छुक होते. पण त्यांची आशा आता जवळपास मावळली आहे. राहुल गांधींनीच स्वतः प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसने पुण्यात आता मराठा कार्ड खेळत निवडणुकीत नवा रंग भरलाय. पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी इतर नावांची शिफारस केली होती. पण शरद पवारांच्या सल्ल्याने नवा चेहरा देण्यात आलाय.

पुणे लोकसभा मतदारसंघातील समीकरणे

2014 मध्ये पुण्यातून भाजपचे अनिल शिरोळे निवडून आले. त्यांना अनुक्रमे – पुण्यातील विधानसभेच्या सर्व सहाही मतदारसंघात भाजपाला मताधिक्य मिळालं होतं. पुणे लोकसभा मतदासंघातून काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांचा पराभव झाला. राष्ट्रकुल घोटाळ्यातील आरोपामुळे तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली. कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती. या उलट भाजपकडून अखेरच्या क्षणी अनिल शिरोळे यांची उमेदवारी जाहीर झाली. ते मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. त्यांतर महापालिकेतही भाजपची सत्ता आली.

2014 मधील उमेदवार आणि मते

उमेदवार     पक्ष    मिळालेली मते

अनिल शिरोळे      भाजप       3,96,136 (विजय)

विश्वजीत कदम     काँग्रेस       1,81,146

दिपक पायगुडे      मनसे         65,179

मतदानाची टक्केवारी       58.50%

विधानसभा मतदारसंघांचं चित्र

शिवाजी नगर – भाजप

कोथरूड – भाजप

पर्वती – भाजप

कसबा – भाजप

कँटोन्मेंट – भाजप

वडगाव शेरी – भाजप

व्हिडीओ पाहा :

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.