Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sambhaji Raje : संभाजीराजे नवा पक्ष काढणार? आज राजेंची पुण्यात पत्रकार परिषद, संभाजीराजेंच्या भूमिकेकडं राज्यभराचं लक्ष

आज संभाजीराजेंची पुण्यात पत्रकार परिषद आहे. राज्यभरातून कार्यकर्ते या पत्रकार परिषदेला येण्याची शक्यता आहे.

Sambhaji Raje : संभाजीराजे नवा पक्ष काढणार? आज राजेंची पुण्यात पत्रकार परिषद, संभाजीराजेंच्या भूमिकेकडं राज्यभराचं लक्ष
छत्रपती संभाजीराजे
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 7:10 AM

मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्व, हनुमान चालीसा, अयोध्या दौरे, ओबीसी आरक्षण, नवनीत राणा अशी विविध प्रकरणं गाजत आहेत. मात्र, राज्याचे राजकारण काही दिवसात वेगळे वळण घेणार का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. कारण गेल्या काही काळापाासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न तसाच प्रलंबित आहे. तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढाही अजून सुटलेला नाही. राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असतानाच्या काळात मराठा आरक्षण दिलं. मात्र, अलिकडच्या काळात सुप्रिम कोर्टात ते टिकलं नाही. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण तसेच ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द करत राज्य सरकारला मोठा दणका दिला. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचंही पहायला मिळालं. संभाजीराजे (Sambhajiraje) यांनीही मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरत राज्यभर मेळावे घेतले. त्यानंतर मराठा समाजाच्या काही मागण्यांसाठी संभाजीराजे उपोषणाला बसलेले दिसून आले. त्यावेळच्या संभाजीराजेंच्या मागण्या तर राज्य सरकारने मान्य केल्या. मात्र, मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यामुळे आता खासदार संभाजीराजे नवा पक्ष काढणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

संभाजीराजेंचं ट्विट

आज संभाजीराजे पुण्यात भूमिका मांडणार

आज संभाजीराजेंची पुण्यात पत्रकार परिषद आहे. राज्यभरातून कार्यकर्ते या पत्रकार परिषदेला येण्याची शक्यता आहे. “महाराष्ट्राच्या भल्यासाठी नवी दिशा, नवा विचार, नवा पर्याय” आशा टॅगलाईन खाली पुण्यात 12 तारखेच्या कार्यक्रमाला येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. खासदार छत्रपती संभाजीराजे आज राज्याचा दौरा करण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील माजी आमदार खासदारांकडून छत्रपती संभाजीराजेंना संपर्क करायला सुरुवात झाली असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

संभाजीराजेंच्या भूमिकेकडं राज्यभराचं लक्ष

छत्रपती संभाजीराजे प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार अशीही माहिती समोर आली आहे. त्यानंतर राज्याचा दौरा करून राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फक्त राजकीय पक्षच नाही तर सामाजिक संघटनांकडून संभाजीराजेंना संपर्क करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आणि याबाबत आज पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजे भूमिका मांडणार अशीही माहिती सुत्रांनी दिली आहे.

शरद पवार काय म्हणाले?

संभाजीराजे यांच्याबाबत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती संभाजीराजे यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपत आला आहे. मी देखील राज्यसभेत त्यांचा सहकारी आहे. ज्यावेळी महाराष्ट्राचे काही प्रश्न राज्यसभेत येतात तेव्हा महाराष्ट्रातील सदस्यांना बोलावून पक्षीय मतभेद बाजूला ठेवून राज्यासाठी एकत्र येण्याची भूमिका आम्ही घेतो. अशा कामांमध्ये संभाजीराजेंचे सहकार्य आम्हाला नेहमी मिळाले आहे. पण त्यांचा कार्यकाळ संपत असताना त्यांना पुन्हा पाठिंबा देण्याविषयीचा निर्णय केवळ एका पक्षाचा नाही. त्यासाठी आम्हाला काँग्रेस आणि शिवसेनेला विचारावे लागेल. त्यामुळे शक्यतो एकत्रित निर्णय घेऊ असेही शरद पवार यांनी सांगितले.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.