SambhajiRaje Chatrapati : आधी प्रवेश, मगच पाठिंबा! राज्यसभेसाठी शिवसेनेची संभाजीराजे छत्रपतींसमोर अट?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेकडून संभाजीराजेंना एक ऑफरही देण्यात आली आहे. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास उमेदवारीसाठी त्यांचा विचार केला जाईल, असं शिवसेनेकडून सांगण्यात आल्याचं कळतंय.

SambhajiRaje Chatrapati : आधी प्रवेश, मगच पाठिंबा! राज्यसभेसाठी शिवसेनेची संभाजीराजे छत्रपतींसमोर अट?
संभाजीराजे छत्रपती, उद्धव ठाकरेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 6:41 PM

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक (Rajya Sabha Election) होणार आहे. यातील दोन जागांवर भाजप, तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळेल इतकं संख्याबळ आहे. तर राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chatrapati) यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय. त्यासाठी सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याचं आवाहनही संभाजीराजे यांनी केलं आहे. त्यांच्या आवाहनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिसाद दिलाय. मात्र, शिवसेनेकडून (Shivsena) संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या मार्गात खो घातला जात आहे. कारण, सहाव्या जागेसाठी उमेदवार देण्याची घोषणा शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलीय. तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेकडून संभाजीराजेंना एक ऑफरही देण्यात आली आहे. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास उमेदवारीसाठी त्यांचा विचार केला जाईल, असं शिवसेनेकडून सांगण्यात आल्याचं कळतंय.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आपण अपक्ष लढणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केलं आहे. त्यानंतर त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना पाठिंबा देण्याचं आवाहनही केलं. त्यांच्या आवाहनानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची शिल्लक राहिलेली मतं संभाजीराजेंना देण्यात येतील, असं जाहीर केलं. तर शिवसेनेकडून मात्र सहाव्या जागेसाठी उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अशावेळी शिवसेनेनं संभाजीराजेंना राज्यसभेसाठी एक ऑफर दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शनिवारी संभाजीराजे आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. त्या बैठकीत संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, त्यानंतर पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी अट घातल्याची माहिती मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसेना सहावा उमेदवार देणार

संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना करत आपण राज्यसभेसाठी अपक्ष उभे राहणार असल्याचं जाहीर केलं. तसंच सर्व पक्षांनी पाठिंबा देऊन पाठवावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मात्र, संभाजीराजे यांची राज्यसभेसाठीची वाट खडतर असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण शिवसेना सहाव्या जागेवर उमेदवार देणार असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे संभाजीराजेंचं दुसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याचं स्वप्न भंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिल्लक राहणारी मते संभाजीराजेंना देऊ – पवार

दरम्यान, शरद पवार यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना छत्रपती संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीस महाविकास आघाडीकडून पाठिंबा जाहीर केला आहे. पवार म्हणाले की, महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर प्रत्येकी एक-एक जागा हमखास निवडून येऊ शकतात. याव्यतिरिक्त शिल्लक राहणारी मते सहाव्या जागेसाठी आम्ही संभाजीराजेंना देऊ, असं पवार म्हणाले होते. मात्र, अनिल परब यांनी शिवसेना दोन उमेदवार देणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे का? असा सवाल आता उपस्थित होतोय.

संभाजीराजेंचं विधानसभेच्या सर्व आमदारांना खुलं पत्र

संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील विधानसभेच्या सर्व आमदारांना खुलं पत्र लिहिलं आहे. ‘राज्यसभेच्या या सहाव्या जागेवर मी दावा करीत आहे. याकरिता मला आपणा सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे. माझी कारकीर्द व प्रामाणिक कार्यपद्धती पाहता, आपण सर्वजण राज्यसभेच्या या सहाव्या जागेसाठी मला निश्चितच सहकार्य कराल, अशी जाहीर अपेक्षा सदर पत्रान्वये मी व्यक्त करतो’, असं संभाजीराजे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.