‘अंधारे’ पैठणमध्ये ‘संध्याकाळी’ आल्या, त्यांना काय विकास दिसणार?; संदिपान भुमरे यांचा खोचक टोला

संदीपान भुमरे यांनी ठाकरे सुषमा अंधारे यांच्या टीकेला आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

'अंधारे' पैठणमध्ये 'संध्याकाळी' आल्या, त्यांना काय विकास दिसणार?; संदिपान भुमरे यांचा खोचक टोला
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 1:23 PM

औरंगाबाद : शिंदे गटाचे नेते आणि औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandeepan Bhumre) यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सुषमा अंधारे (Sushama Andhare) पैठणमध्ये संध्याकाळी आल्या.त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला त्यांना विकास काय दिसणार?, असं भुमरे म्हणाले आहेत. याशिवाय त्यांनी पैठणमध्ये काय-काय कामं केली आहेत,  हे देखील सांगितलं आहे.

सुषमा अंधारे या पैठणमध्ये संध्याकाळी आल्या, त्यांना काय विकास दिसणार? त्या मतदारसंघात अर्ध्या तास थांबल्या, स्थानिक नेत्यांनी टीका केली असती तर ठीक होत असं म्हणत संदिपान भुमरे यांनी अंधारेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

सुषमा अंधारे यांनी किती सभा घेतल्या. त्यांच्या सभेला किती गर्दी आली तर काहीही होणार नाही. कारण त्यांनी अडीच वर्षात काहीही केलं नाही. आम्ही लोकांची कामं केलीत म्हणून लोकांची कामं केलीत. म्हणून लोक आमच्या पाठिशी आहेत, असं भुमरे म्हणाले.

अंधारे काय म्हणाल्या होत्या?

अजित पवार यांनी मुख्यमंत्री असताना 890 कोटींचा निधी दिला. पण यांनी किती खावं?. किमान संदीपान भुमरे यांनी खाल्ल्यानंतर ढेकर तरी द्यावा ना… पैठण-औरंगाबादच्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. म्हणून सभेला यायला उशीर झाला. भुमरे यांच्यामुळेच पैठणची ही दुरावस्था झाली आहे, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी भुमरेंवर निशाणा साधलाय. त्याला आता भुमरेंनी प्रत्युत्तर दिलंय.

सुषमा अंधारे यांना उत्तर देताना भुमरे यांनी यावेळी केलेल्या विकासकामांचा पाढाच वाचून दाखवला. काल सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेत पैठणमध्ये बोलताना संदिपान भुमरे यांच्यावर विकास कामांवरून जोरदार टीका केली होती. त्याला आता भुमरे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.