“आता तुम्ही फक्त पूजा अर्चा करा”, संदीपान भुमरे यांचा चंद्रकांत खैरेंना सल्ला
रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद आता वाढत चालला आहे. "आता तुम्ही फक्त पूजा अर्चा करा", असा सल्ला संदीपान भुमरे चंद्रकांत खैरेंना दिलाय.
पैठण: रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यातील वाद आता वाढत चालला आहे.”आता तुम्ही जिल्ह्याच्या राजकाणार लक्ष घालू नका, फक्त पूजा अर्चा करा”, असा सल्ला संदीपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरेंना दिलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पैठणला सभा होतेय. त्याआधी या दोन नेत्यांमध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगलंय. खैरे आमच्या महिलाचा अपमान करत आहे. आमचे लोक विकाऊ आहेत. असं ते म्हणत आहे पण आमचे लोक विकाऊ नाहीत सगळ्या क्लिपा त्यांनीच तयार केल्या आहेत, असंही भुमरे म्हणालेत.