गुजरात विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा निवडून आलेली मराठी महिलाआमदार आहे तरी कोण?
मराठी लोकांची संख्या जास्त आहे. या मतदारसंघात ८० हजार मराठी मतदार आहेत, ७६ हजार मुसलमान, ३८ हजार गुजराथी, २१ हजार
सूरत : गुजरात विधानसभेत सलग तिसऱ्यांदा एका महिलेने विजय मिळवला आहे. ही महिला मराठी आहे, मूळची महाराष्ट्रातली आहे. संगीता पाटील या गुजरातमधील लिंबायत मतदारसंघातून सलग तिसऱ्या वेळेस विजयी झाल्या आहेत. संगीता पाटील या भाजपाच्या आमदार आहेत, त्या भाजपा प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या विश्वासू कार्य़कर्त्यांपैकी एक आहेत. लिंबायत या मराठी बहुल मतदारसंघात संगीता पाटील या एक-दोन नाही तर सलग तिसऱ्या वेळेस विजयी होत आहेत. लिंबायत मतदारसंघातील मराठी मतदारांचा त्यांना प्रचंड प्रतिसाद आहे.सी.आर.पाटील देखील गुजरातमधून खासदार आहेत, मराठी मतदारांचा त्यांनाही मोठा फायदा झाला आहे.
गोपाळ डी पाटील या काँग्रेस उमेदवाराला एकूण २९ हजार मतं मिळाली, तर आपचे उमेदवार पंकजभाई तायडे यांनी ३७ हजार मतं मिळाली, तर भाजपाच्या संगीता पाटील यांना ९५ हजार मतं मिळाली.या तीन मराठी उमेदवारांच्या लढतीत संगीता पाटील या विजयी झाल्या आहेत.
महाराष्ट्रातील खानदेशातील मराठी लोकांची संख्या जास्त आहे. या मतदारसंघात ८० हजार मराठी मतदार आहेत, ७६ हजार मुसलमान, ३८ हजार गुजराथी, २१ हजार उत्तर भारतीय, तर ११ हजार राजस्थानी आणि १२ हजार तेलुगू लोकांचा समावेश आहे.
पिण्याचं पाणी, शुद्ध पाणी ही मतदारसंघातील मुख्य अडचण आहे. पाणी आता सी.आर.पाटील आणि संगीता पाटील यांनी मराठी लोकांसाठी सुरत, उधना,नवसारी, लिंबायत या ठिकाणी सर्व सुविधा असलेले सांस्कृतिक हॉल उभारण्याची मागणी होत आहे.