VIDEO | आमदाराची बॉलिंग, तिघा मंत्र्यांची बॅटिंग, सांगलीच्या पीचवर शिवसेना-काँग्रेसच्या दिग्गजांची फटकेबाजी

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्या वतीने आमदार चषक स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत (Sangli Minister Cricket)

VIDEO | आमदाराची बॉलिंग, तिघा मंत्र्यांची बॅटिंग, सांगलीच्या पीचवर शिवसेना-काँग्रेसच्या दिग्गजांची फटकेबाजी
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 12:53 PM

सांगली : महाविकास आघाडीतील मंत्री राजकीय मैदानात तुफान फटकेबाजी करताना सर्वांनीच पाहिलं आहे. मात्र दोन पक्षांतील तीन मंत्र्यांना एकाच मैदानावर क्रिकेट खेळताना पाहण्याचा योग सांगलीवासियांना आला. काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या यशोमती ठाकूर, युवा नेते विश्वजीत कदम आणि शिवसेनेचे ‘दादा’ नेते दादा भुसे यांनी सॉल्लिड फटकेबाजी केली. (Sangli Minister Dada Bhuse Yashomati Thakur Vishwajeet Kadam Cricket)

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्या वतीने आमदार चषक स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचे काल उद्घाटन करण्यात आले. यावेळी कृषी मंत्री दादा भुसे, महिला आणि बाल कल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. तिघांनीही मैदानात चांगलीच फटकेबाजी केली. विशेष म्हणजे खुद्द आमदार विक्रम सावंत यांनीच तिघांना गोलंदाजी केली.

पाहा व्हिडीओ :

राजकारणातील दिग्गजांची फटकेबाजी

नाणेफेक करुन नितीन राऊत मैदानात

सुदर्शन प्रिमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप टूर्नामेंट 2021 चे नागपुरात आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. नितीन राऊत यांनी प्रमुख उपस्थिती लावत स्पर्धेत सहभागी खेळाडूंचा उत्साह वाढवला. नितीन राऊत यांनी नाणेफेक केली. त्यानंतर स्वतः हातात बॅट घेऊन राऊत खेळपट्टीवर उभे राहिले आणि त्यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

हसन मुश्रीफ यांची तडाखेबाज फलंदाजी

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही काही दिवसांपूर्वी क्रिकेटचं मैदानही गाजवलं. कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांनी बॅटिंग करताना चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. मुश्रीफ यांची तडाखेबाज फलंदाजी पाहून समर्थकही अवाक झाले. (Sangli Minister Dada Bhuse Yashomati Thakur Vishwajeet Kadam Cricket)

मिलिंद नार्वेकरांची फटकेबाजी

मुंबईतील विक्रोळी पार्कसाईटमध्ये ‘महाविकास आघाडी चषक’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थिती लावली होती. कै. हिंदुराव देशमुख यांच्या स्मरणार्थ ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत नार्वेकरांनी तूफान फटकेबाजी केली.

संबंधित बातम्या :

VIDEO | महाविकास आघाडी चषकात मिलिंद नार्वेकरांची तुफान फटकेबाजी

VIDEO | राजकीय मैदानात तुफान बॅटिंग, हसन मुश्रीफ यांची क्रिकेटच्या मैदानातही फटकेबाजी

VIDEO | राजकीय मैदानात तुफान बॅटिंग, नितीन राऊत यांची क्रिकेटच्या मैदानातही फटकेबाजी

(Sangli Minister Dada Bhuse Yashomati Thakur Vishwajeet Kadam Cricket)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.