ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचा बिनविरोध झेंडा

संजय भोईर यांची स्थायी समिती सभापतीपदी, तर विलास जोशी यांची परिवहन समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाली

ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचा बिनविरोध झेंडा
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 6:41 PM

ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी (TMC Standing Committee) शिवसेनेने (Shivsena) बिनविरोध झेंडा रोवला. स्थायीच्या सभापतीपदी संजय भोईर (Sanjay Bhoir), तर परिवहन समितीच्या सभापतीपदी विलास जोशी (Vilas Joshi) यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. या निवडीची औपचारिक घोषणा केवळ बाकी आहे. (Sanjay Bhoir elected as Thane Municipal Corporation Standing Committee Speaker)

स्थायी समिती आणि परिवहन समिती सभापती पदासाठी अर्ज दाखल करायचे होते. शिवसेनेतर्फे आज संजय भोईर यांनी स्थायी समिती सभापती पदासाठी तर परिवहन समिती सभापती पदासाठी विलास जोशी यांनी आपले अर्ज दाखल केले. या दोन्ही समित्यांमध्ये शिवसेनेचं बहुमत असल्यानं शिवसेनेतर्फे दिल्या जाणाऱ्या उमेदवारांची निवड निश्चित होती.

शिवसेनेशिवाय इतर कोणीही अर्ज दाखल न केल्यामुळे संजय भोईर यांच्या स्थायी समिती सभापतीपदी, तर विलास जोशी यांची परिवहन समिती सभापतीपदी बिनविरोध निवड होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

अर्ज भरताना ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह महापौर नरेश म्हस्के आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. बिहारमध्ये आमची सत्ता नव्हती. नागरिकांनी दिलेला कौल आम्ही मान्य करतो, मतदारांचा कौल स्वीकारलाच पाहिजे, असेही शिंदे म्हणाले.

(Sanjay Bhoir elected as Thane Municipal Corporation Standing Committee Speaker)

याआधीही, मुंबई महापालिकेतील समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेने झेंडा फडकवला आहे. मुंबई महापालिका शिक्षण समिती आणि स्थायी समितीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेतला. शिवसेना आणि काँग्रेसची महापालिकेत छुपी आघाडी झाल्याने शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का देण्याचे भाजपचे मनसुबे फोल ठरले.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या संध्या दोशी, तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे यशवंत जाधव निवडून आले.

संबंधित बातम्या :

काँग्रेसने शब्द पाळला, BMC च्या तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडेच

दोन्ही उमेदवारांचीच मतं अवैध, तरीही बेस्ट अध्यक्षपदी पुन्हा शिवसेनेचाच झेंडा

(Sanjay Bhoir elected as Thane Municipal Corporation Standing Committee Speaker)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.