नेहमी पाठीशी उभा राहणारा बंजारा समाज संजय राठोडांची साथ सोडणार आणि…

राज्यातील 50 ते 60 टक्के बंजारा समाजाच्या बांधवांनी संजय राठोड यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

नेहमी पाठीशी उभा राहणारा बंजारा समाज संजय राठोडांची साथ सोडणार आणि...
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 12:11 AM

मुंबई : शिंदे गटातील मंत्री आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड(Sanjay Rathore) यांना जबरदस्त झटका बसणार आहे. नेमही पाठीशी उभा राहणारा बंजारा समाज(Banjara Samaj ) संजय राठोडांची साथ सोडणार आहे. 50 ते 60 टक्के बंजारा समाज उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील 50 ते 60 टक्के बंजारा समाजाच्या बांधवांनी संजय राठोड यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बंजारा समाजाने शिवबंधन बांधून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या तीन दिवसात बंजारा समाजाचे लोक मातोश्रीवर जाउन शिवबंधन हातावर बांधणार आहेत. हे सर्व उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत शिवसेनेचा भगवा हातात घेणार आहेत.

बंजारा समाजाने शिवसेनेत प्रवेश केल्यास संजय राठोड यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. यामुळे संजय राठोड यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

संजय राठोड याचे बंजारा समाजात विशेष स्थान आहे. शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. 1997 मध्ये वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी ते यवतमाळ शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष झाले होते.

विशेष म्हणजे संजय राठोड यांनी 2004 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे नेते माणिक ठाकरे यांचा पराभव केला. यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठी कलाटणी मिळाली. 2009 मध्ये त्यांनी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांचा पराभव केला. यानंतर शिवसेना पक्षात त्यांचे महत्त्व वाढले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना वनमंत्री पद देण्यात आले. मात्र, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात त्यांना मंत्रीपद सोडावे लागले.

यानंतर ते बंडखोर एकनाथ शिंदे गटात सामिल झाले. त्यांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात आले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.