देशात हुकुमशाहीचं टोक गाठलं, विरोधकांना चिरडण्याची पद्धत हिटलरपेक्षाही भयंकर, स्वातंत्र्यासाठी पुन्हा लढावं लागणार, संजय राऊतांचा अयोध्येतून प्रहार!

न्यायालयापासून निवडणूक आयोगापर्यंत सगळेच दबावाखाली आहेत. आमच्या सगळ्यांच्या बाबतीत हे सिद्ध होतंय. शिवसेनेचं मत बाद करण्यासाठी साडेसात तास लावले. मुंबईतून निवडणूक आयोगाशी कोण बोलत होतं, कोया सूचना, माहिती दिली जात होती, हे सगळं आम्हाला माहिती आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. 

देशात हुकुमशाहीचं टोक गाठलं, विरोधकांना चिरडण्याची पद्धत हिटलरपेक्षाही भयंकर, स्वातंत्र्यासाठी पुन्हा लढावं लागणार, संजय राऊतांचा अयोध्येतून प्रहार!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 10:21 AM

लखनौ : देशात केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत विरोधकांना त्रास देण्याचा कार्यक्रम सुरु आहे. ही हुकुमशाहीची (Dectetoeship) सुरुवात नाही तर हुकुमशाहीचं टोक म्हणावलं लागेल. विरोधकांना चिरडण्याची ही पद्धत हिटलरपेक्षाही भयंकर असल्याची टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. लखनौ येथून पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं. शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे पर्यवरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray in Ayodhya) यांचा आज अयोध्या दौरा आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत अयोध्येत आहेत. यावेळी पत्रकारांना त्यांनी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यातील कार्यक्रम स्पष्ट केला. तसेच शिवसेनेच्या हिंदुत्वावर होणारी टीका तसेच राहुल गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी होत असलेली चौकशी आदि विविध मुद्द्यांवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली.

‘देशात हुकुमशाहीचं टोक गाठलं जातंय’

केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजप नेतृत्वाकडून गैरवापर सुरु आहे, असा आरोप करताना संजय राऊत म्हणाले, ‘ पक्षवाढीसाठी काम करणाऱ्यांना केंद्रीय तपास यंत्रणा त्रास देत आहेत. राहुल गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात रात्री 12 वाजेपर्यंत चौकशी होतेय. ही हुकुमशाहीची सुरुवात नाही तर हुकुमशाहीचं टोक गाठलंय. आपली सत्ता टिकवण्यासाठी एवढ्या जुलमी पद्धतीनं विरोधकांना चिरडण्याचं काम हिटलरनंही केलं नसेल. जगभरात हिंदुस्तानच्या लोकशाहीचे जगभरात दाखले दिले जातात. त्या देशात लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले जात आहे. हा आमच्या स्वातंत्र्याचा पराभव आहे. तो पराभव भाजपच्या नेतृत्वाखाली करतंय. त्यामुळे आणखी एका स्वातंत्र्याची लढाई आपल्याला करावी लागणार आहे.

‘कोणतीच यंत्रणा निष्पक्ष राहिली नाही’

संजय राऊत म्हणाले, ‘ शिवसेनेचे सहकारी अनिल परब यांच्या कारकीर्दाचा अभ्यास केला तर ही केस त्यांच्यावर कोणत्या पद्धतीने लादली गेलीय, याच आश्चर्य वाटेल. राज्यसभा निवडणुकीतही केंद्रीय यंत्रणांचा वापर करून .. सुहास कांदे यांचं मत बाद करण्यापासून.. अडचणीत आणण्याचं काम केलं. देशातील कोणती यंत्रणा स्वतंत्र, निष्पक्षनाही. न्यायालयापासून निवडणूक आयोगापर्यंत सगळेच दबावाखाली आहेत. आमच्या सगळ्यांच्या बाबतीत हे सिद्ध होतंय. शिवसेनेचं मत बाद करण्यासाठी साडेसात तास लावले. मुंबईतून निवडणूक आयोगाशी कोण बोलत होतं, कोया सूचना, माहिती दिली जात होती, हे सगळं आम्हाला माहिती आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा कसा?

– 1.30 वाजता अयोध्येत आगमन होईल. -3.30 वाजता पत्रकार परिषद घेतील – 4.45 वाजता इस्कॉन मंदिरात दर्शन घेतील – 5.30 वाजता राम लल्लांचे दर्शन घेतील – 6.30 वाजता शरयू तीरावर महाआरती होईल – 7.30 लखनौसाठी प्रस्थान करतील आणि तेथून मुंबईत परततील.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.