Video: …असे चुX#@ देशात भरपूर,पत्रकारांनी सोमय्यांबद्दल विचारताच संजय राऊत भडकले, पाहा काय म्हणाले?
के. चंद्रशेखऱ राव यांच्या भेटी संदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला असता, किरीट सोमय्या कोण आहेत, कोण आहेत ते मला माहिती नाही. असे चुX#@ देशात भरपूर आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज दुपारी 1 वाजता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतील, अशी माहिती त्यांनी दिली. देशाच्या राजकारणात अनेक बदल होणार आहेत. ममता बॅनर्जी, स्टॅलिन, केसीआर, उद्धव ठाकरे यांची गैरभाजपशासित सरकार देशाच्या आगामी राजकारणाबाबत चर्चा करत आहेत. शरद पवार आमचे मार्गदर्शक आहेत त्यांच्याशी देखील चर्चा होईल, असं संजय राऊत म्हणाले. नव्या राजकारणाच्या स्थितीवर देश जात आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं. यानंतर पत्रकारांनी किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) आज के. चंद्रशेखऱ राव यांच्या भेटी संदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला असता, किरीट सोमय्या कोण आहेत, कोण आहेत ते मला माहिती नाही. असे चुX#@ देशात भरपूर आहेत. त्यांच्या संदर्भात शिवसेनेला प्रश्न विचारू नयेत, असं संजय राऊत म्हणाले 2024नंतर असे चुX#@ देशात राहणार नाहीत, असं संजय राऊत म्हणाले. त्यानंतर राजकारण लोकशाही आणि पारदर्शक असेल, असं ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंना एक मुख्यमंत्री भेटायला येतो. त्याचा अशा प्रकारे अपमान केला जातो. हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. राज्यातील साडे अकरा कोटी जनतेचा अपमान आहे. या प्रकारची भाषा भाजप नेते वापरतात त्यांना मी पुन्हा चुX#@ म्हणतो. अशा लोकांना केंद्र सरकार संरक्षण देतं हा देखील महाराष्ट्राचा अपमान असल्याचं संजय राऊत म्हणाले.
काँग्रेसची भूमिका देखील महत्त्वाची
संजय राऊत यांनी यावेळी बोलातना 2024 च्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केलं. 2024 च्या निवडणुकी पासून देशाचं राजकारण बदलणार आहे. गैर भाजप राज्य सरकारांची यामध्ये महत्त्वाची भूमिका असेल, असं संजय राऊत म्हणाले. देशाचं राजकारण 2024 पासून बदलणार आहे. त्यात काँग्रेसची भूमिका देखील महत्त्वाची आहे, असं ते म्हणाले.
पाहा व्हिडीओ
संजय राऊतांचं पुन्हा मराठी कार्ड
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्यांबद्दल प्रतिक्रिया देणं सुरुवातीला टाळलं होतं. पत्रकारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी के. चंद्रशेखर राव यांना भेटण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची परवानगी घेतलीय का असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर संजय राऊत भडकले. संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांचं वक्तव्य हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान असल्याचं म्हटलं. महाराष्ट्रातील साडे अकरा कोटी मराठी जनतेचा अपमान असल्याचं म्हटलं. मराठीचा अपमान करणाऱ्या लोकांना केंद्र सरकार सुरक्षा देतं, असं ही ते म्हणाले.
इतर बातम्या