Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut Ayodhya Visit : ‘अयोध्या ही आमची पायवाट, तारीख लवकरच जाहीर करु’, संजय राऊतांचा दावा; मनसे, भाजपवर पलटवार

शिवसेना खासदार संजय राऊत आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यात एक बैठकही पार पडली. त्यानंत बोलताना अयोध्या शिवसेनेसाठी नवीन नाही. ती आमची पायवाट आहे, असा टोला संजय राऊतांनी मनसेला लगावलाय.

Sanjay Raut Ayodhya Visit : 'अयोध्या ही आमची पायवाट, तारीख लवकरच जाहीर करु', संजय राऊतांचा दावा; मनसे, भाजपवर पलटवार
संजय राऊत, खासदार, शिवसेनाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 5:26 PM

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या हिंदुत्व आणि अयोग्या दौऱ्याचं राजकारणच चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 5 जून रोजी अयोध्या यात्रेची घोषणा केलीय. मनसेकडून त्यासाठी जय्यत तयारीही करण्यात येत आहे. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी एक खास रेल्वेचं बुकिंग करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे युवासेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे देखील अयोध्या दौरा करणार आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीला त्यांचा दौरा होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जातोय. आदित्य ठाकरे यांनीच त्याबाबत संकेत दिले आहेत. तर आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यात एक बैठकही पार पडली. त्यानंत बोलताना अयोध्या शिवसेनेसाठी नवीन नाही. ती आमची पायवाट आहे, असा टोला संजय राऊतांनी मनसेला लगावलाय.

‘आमचा अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम आधीच ठरलाय’

संजय राऊत म्हणाले की, अयोध्या शिवसेनेसाठी नवीन नाही. ती आमची पायवाट आहे. गेली 30 वर्षे शिवसेना आणि अयोध्या हे नातं आहे. त्यामुळे आम्हाला तयारी करण्याची गरज नाही. आम्ही अयोध्येत जात असतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसतानाही जाऊन आले आणि नंतरही. स्वत: आदित्य ठाकरेही जाऊन आले. मधल्या काळात कोरोनामुळे आम्हाला जाता आलं नाही. आमचा अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम आधीच ठरलाय. चार पाच दिवसांत तारीख ठरवू, असंही राऊतांनी जाहीर केलंय.

‘अयोध्याच्या आंदोलनात शिवसैनिकांनी बलिदान दिलंय’

शरयूच्या तिरावर एखादा कार्यक्रम करायचा तेव्हा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी आमचे कार्यकर्ते तिकडे गेले आहेत. कोण काय म्हणतं यावर आमचे दौरे ठरत नाहीत. अयोध्याच्या आंदोलनात शिवसैनिकांनी बलिदान दिलंय. कुणी त्यावर बोलत असेल तर ते अयोध्या आंदोलनाचा, बलिदानाचा अपमान असेल, असा पलटवार त्यांनी शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांवर केलाय. तसंच आम्हाला वादळं नवीन नाहीत, अशी वादळं परतवून लावण्याची आणि तसंच नवीन वादळं निर्माण करण्याची क्षमता फक्त शिवसेनेतच आहे, असा दावाही त्यांनी केलाय.

अयोध्या दौऱ्याबाबत आदित्य ठाकरे काय म्हणाले?

आदित्य ठाकरे हे मे महिन्याच्या सुरुवातीला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्याबाबत विचारलं असता आपण लवकरच अयोध्येला दर्शनासाठी जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. संजय राऊत आणि आपली याबाबत कालच चर्चा झाली. अयोध्या दौऱ्याची तारीख काय असावी, याबाबत राऊत यांच्याशी चर्चा केल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

इतर बातम्या : 

Devendra Fadnavis : ‘आम्हाला हिंदुत्वाची शाल पांघरण्याची गरज नाही’, फडणवीसांचा शिवसेनेला टोला, पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं

Ramdas Athawale on Raj Thackeray | एका बाजूला भोंगे, दुसऱ्या बाजूला सोंगे; नागपुरात रामदास आठवलेंची राज ठाकरेंवर टीका

अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले.
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला.
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा.
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?.
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू.
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल.