Sanjay Raut | नितीश कुमारांनी लव्ह जिहादबाबत कायदा करावा, संजय राऊतांचं चॅलेंज

बिहारमध्ये नितीशकुमारांनी लव्ह जिहादवर कायदा करावा, आम्ही त्यानंतर पाहू, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत | Sanjay Raut

Sanjay Raut | नितीश कुमारांनी लव्ह जिहादबाबत कायदा करावा, संजय राऊतांचं चॅलेंज
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 5:58 PM

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बिहारमध्ये नितीश कुमारांनी लव्ह जिहादवर कायदा करावा, आम्ही त्यानंतर पाहू, असं चॅलेंज दिलं आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी लव्ह जिहादबाबत कायदा करण्याबद्दल केलेल्या मागणीविषयी संजय राऊत बोलत होते. “काही लोक लव्ह जिहादबाबत कायदा करण्यास सांगत आहेत. या विषयावर माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे”, असं राऊत यांनी स्पष्ट केले. (Sanjay Raut comment on demand of Love Jihad  Act)

भाजप लव्ह जिहादच्या कायद्याची मागणी करत आहे.उत्तर प्रदेशमध्ये करत आहेत, इतर राज्यांमध्ये करत आहेत. तर, माझी सूचना अशी आहे की इतर राज्यात कोण काय कायदा करतं ते पाहायचं आहे. खासकरुन बिहारमध्ये नितीश कुमार कुठल्या प्रकारचा कायदा करतात ते पाहायचं आहे. त्या कायद्याचा आम्ही अभ्यास करु, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना दिले.

बिहारमध्ये नितीश कुमार भाजपच्या सहकार्याने तिथे मुख्यमंत्री झाले आहेत. ते सरकार भाजप चालवत आहेत. त्यांचं सरकार लव्ह जिहाद बाबत जो कायदा करतील त्या कायद्याचा आम्ही अभ्यास करु आणि त्यानंतर काय करायचं ते पाहू. भाजपने त्याबाबत बिहारमध्ये एक आदर्श कायदा बनवावा. त्यानंतर महाराष्ट्राला यासंदर्भातील प्रश्न विचारावे.

पश्चिम बंगालच्या निवडणुका पार पडल्या म्हणजे या विषयातील राजकारण संपलं. तरीही त्यामध्ये आम्हाला काही वाटलं तर नितीश कुमार जो कायदा बनवतील त्याकायद्याचा आम्ही अभ्यास करु, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले. (Sanjay Raut comment on demand of Love Jihad  Act)

महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकांचे राज्य बनवणार

भाजपकडे विकासाचे मुद्दे नाहीत. महाराष्ट्रामध्ये विकासासंदर्भात मुख्यमंत्री जे काम करत आहेत. ते डिस्टर्ब करायचं अशा प्रकारचं एक धोरणात्मक निर्णय भाजपचा असेल, तरी या अडथळ्यांच्या शर्यतीत सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विकासाच्या मार्गाने जातील आणि महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर पोहोचवू, राज्याला पुढील तीन वर्षातच पहिल्या क्रमांकावर नेऊ, असा विश्वास आणि आत्मविश्वास आम्हाला आहे, असं राऊत म्हणाले.

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत त्यावर कोणीही बोलत नाही. त्यातुलनेत पेट्रोल, डिझेल आणि रॉकेलचे भाव कमी व्हायला हवेत. त्यावर कोणीही बोलत नाही, असं संजय राऊत यांनी वीजबिल प्रश्नी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर टीकास्त्र

महाराष्ट्रातील भाजप नेते पातळी सोडून टीका करत आहेत. शरद पवार हे छोटे नेते आहेत असं भाजप नेते म्हणाले, मग नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शरद पवारांना पद्मविभूषण पुरस्कार दिला मग मोदी सरकारला कळत नाही का?, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या पुढाऱ्यांचे ताळतंत्र सुटलेय, पहाटेच्या शपथविधीला एक वर्ष झालं आहे. भाजप नेते भ्रमिष्ट झाले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्याकडे लक्ष देऊ नये, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. (Sanjay Raut comment on demand of Love Jihad  Act)

“शरद पवार यांच्यासारख्या नेत्यावर अशा प्रकारची टीका करणे म्हणजे तुमचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. सत्ता येते जाते. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांच्या सारख्या नेत्यांची उंची कोणी काही बोललं म्हणून कमी होत नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या:

Sanjay Raut | महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात, नियमांचं पालन होत आहे:संजय राऊत

तुम्हाला भगवा फडकवायचा असेल तर बेळगाव-काश्मिरात फडकवा, संजय राऊतांचा भाजपवर हल्ला

(Sanjay Raut comment on demand of Love Jihad  Act)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.