अनेक खटले पाहिले, मला मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कुणी थांबवू शकत नाही : संजय राऊत
माझ्या शहराच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून मला कुणी थांबवू शकत नाही, असे ट्विट खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
मुंबई : माझ्या शहराच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून मला कुणी थांबवू शकत नाही, असे ट्विट खासदार संजय राऊत यांनी केले आहे. अभिनेत्री कंगना रनौत कार्यालय पाडकाम प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात संजय राऊत यांना प्रतिवादी करण्यात आल्यानंतर त्यांनी हे ट्विट केले आहे (Sanjay Raut comment on High Court decision on Kanganas bungalow demolition).
एका अभिनेत्रीने उच्च न्यायालयात महापालिकेने अवैध बांधकामाबाबत केलेल्या कारवाईबाबत याचिका दाखल केली आहे. महापालिका ही स्वायत्त संस्था आहे. मात्र तरीही यात राज्यसभेच्या खासदाराला पक्षकार करण्यात यावे, अशी मागणी तिने केल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
बाबरी खटला असो किंवा मराठी अस्मितेबाबतची केस असो, अशा अनेक खटल्यांना सामोरा गेलो आहे. तेव्हा अशा केसमुळे माझ्या शहराच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून मला कुणी थांबवू शकत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. जे. कठवालिया आणि न्यायमूर्ती आर.आय. छागला यांच्या बेंचने मुंबई महापालिकेच्या पश्चिम विभागाचे अधिकारी भाग्यवंत लाटे यांनाही कंगना रनौतच्या बांद्रा येथील कार्यालयाच्या पाडकाम प्रकरणी प्रतिवादी करण्यात आले आहे. याप्रकरणी बुधवारी सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे.
मुंबई महापालिकेच्या पथकाने 8 सप्टेंबरला कंगनाच्या कार्यालयात पाडकाम केले होते. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान म्हटले होते. त्यापूर्वी संजय राऊत आणि कंगना रनौत यांच्यात ट्विटरवर वाद झाला होता.
संबंधित बातम्या :
आम्ही कोणालाच बाहेर जायला सांगितले नाही, फक्त मुंबई-महाराष्ट्राला आपले म्हणा : संजय राऊत
Sanjay Raut comment on High Court decision on kanganas bungalow demolition