“महाराष्ट्र लुटण्यासाठी अमित शाहांचे दौरे सुरु, उद्या लालबागचा राजाही गुजरातला…” संजय राऊतांचा घणाघात

"पक्ष फोडा, पक्ष तोडा हे त्यांचे काम नाही. न्यायालय, निवडणूक आयोगावर दबाव आणा, हे त्यांचे काम नाही. पण हेच काम देशाचे गृहमंत्री सध्या करत आहेत", असे संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्र लुटण्यासाठी अमित शाहांचे दौरे सुरु, उद्या लालबागचा राजाही गुजरातला... संजय राऊतांचा घणाघात
Follow us
| Updated on: Sep 08, 2024 | 11:32 AM

Sanjay Raut Criticise Amit Shah : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यावेळी ते भाजपच्या विविध नेत्यांची भेट घेणार असल्याचे बोललं जात आहे. त्यासोबत अमित शाह हे विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपाबद्दलही चर्चा करणार असल्याचे बोललं जात आहे. त्यानंतर उद्या सोमवारी ते लालबागचा राजाचे दर्शन घेणार आहेत. आता अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. मणिपूरमध्ये हल्ले होतात आणि देशाचे गृहमंत्री मुंबईत येऊन मजा करतात. मणिपूरमध्ये जा, जम्मू काश्मीरमध्ये जा, मुंबईत तुमचं काय आहे? अशा शब्दात संजय राऊतांनी हल्लाबोल केला.

संजय राऊतांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावर जोरदार टीका केली.”महाराष्ट्र लुटण्यासाठी अमित शाहांचे दौरे सुरु आहेत. त्यांना महाराष्ट्र तोडायचा आहे. महाराष्ट्राला कमजोर करायचे आहे. महाराष्ट्राची प्रगती, महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांच्या डोळ्यात खुपतो आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

“अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. गृहमंत्री असल्याने त्यांना मुंबईत येण्यासाठी परवानगीची गरज नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. अमित शाह यांना आमचा विरोध यासाठीच आहे की त्यांनी महाराष्ट्रात दळभद्री राजकारण करुन महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला. मुंबई महाराष्ट्रातून ज्या पद्धतीने व्यापार, उद्योग, रोजगार अनेक महत्त्वाच्या आर्थिक केंद्र गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अमित शहा यांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. आज ते गृहमंत्री आहेत, पण कमजोर गृहमंत्री आहेत, या महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.

“जम्मू-काश्मीर, मणिपूर आणि इतर भागातील कायदा सुव्यवस्थेकडे यांचं अजिबात लक्ष राहिलेलं नाही. राजकारण, पक्ष फोडी, लुटमार याला पाठिंबा देणं, मुंबई लुटणं, लुटणाऱ्यांना पाठिंबा देण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखं महाराष्ट्रातलं स्वाभिमानी पक्ष फोडून महाराष्ट्र अतिकमजोर करणं अशाप्रकारची काम त्यांनी केली. हे गृहमंत्र्यांचे काम नाही. महाराष्ट्र विकलांग करायचा, दुर्बल करायचा हे यांचं स्वप्न आहे आणि त्यासाठीच ते महाराष्ट्रात येत असतात, मुंबईत येत असतात. महाराष्ट्राची जनता त्यांना या राज्याचा शत्रू मानते”, असेही संजय राऊतांनी म्हटले.

“उद्या लालबागचा राजाही गुजरातला नेण्याचा प्रस्ताव देतील”

“लालबागच्या राजाच्या दर्शनाला ते येत आहेत. येऊ द्या, पण मला सारखी भीती वाटते की ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग, अनेक संस्था त्यांनी गुजरातला पळवल्या त्याप्रमाणे ते एक दिवस लालबागचा राजा गुजरातला नेणार नाहीत ना… हेही होऊ शकतं हे काहीही करू शकतात. लालबागचा राजा प्रसिद्ध आहे, देशभरातून लोक दर्शनासाठी येत असतात म्हणून अमित शाह उद्या लालबागचा राजाही गुजरातला नेण्याचा प्रस्ताव देतील. हे व्यापारी लोक आहेत. मी खूप विचार करुन बोलतोय. ते स्वत:ला महाराष्ट्राचा शत्रू मानतात.

भाजपच्या लोकांना अनेक राज्य लुटायची आहेत. गृहमंत्री म्हणून अमित शाहा यांचे सर्वांना समान न्याय द्यायचे काम आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे त्यांचं काम आहे. पक्ष फोडा, पक्ष तोडा हे त्यांचे काम नाही. न्यायालय, निवडणूक आयोगावर दबाव आणा, हे त्यांचे काम नाही. पण हेच काम देशाचे गृहमंत्री सध्या करत आहेत. अशाप्रकारचा महाराष्ट्रात एक गृहमंत्री होता, याची इतिहासात नक्कीच नोंद राहिल”, असे संजय राऊतांनी म्हटले.

“मणिपूरमध्ये हल्ले होतात आणि देशाचे गृहमंत्री मुंबईत येऊन मजा करतात”

“महाराष्ट्र लुटण्यासाठी अमित शाहांचे दौरे सुरु आहेत. त्यांना महाराष्ट्र तोडायचा आहे. महाराष्ट्राला कमजोर करायचे आहे. महाराष्ट्राची प्रगती, महाराष्ट्राचा स्वाभिमान त्यांच्या डोळ्यात खुपतो आहे. लोकसभेचा निकाल ज्याप्रकारे महाराष्ट्राने दिले आहेत, त्यानुसार त्यांना विधानसभेत महाराष्ट्राला आणखी कमजोर करायचे आहे, त्यामुळे ते विधानसभेच्या निवडणुका जाहीर करत नाहीत. जर हिंमत असेल तर विधानसभेच्या निवडणुका हरियाणासोबत घ्या. मुंबई महापालिकेच्या निवडणुकाही घ्या. मुंबई, पुणे, नागपूर यांची लूट करणे हाच तुम्हाचा सर्वाधिक मोठा धंदा आहे. मणिपूरमध्ये हल्ले होतात आणि देशाचे गृहमंत्री मुंबईत येऊन मजा करतात. मणिपूरमध्ये जा, जम्मू काश्मीरमध्ये जा, मुंबईत तुमचं काय आहे? मणिपूरला जाण्याची हिंमत करुन दाखवा”, असे संजय राऊत म्हणाले.

जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.