Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ओठाला लाली आणि तोंडाला पावडर लावून बसलेल्यांनी खिडकी बंद करावी”

शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखात पुन्हा एकदा भाजपवर जहरी टीका करण्यात आली आहे (Sanjay Raut criticize BJP in Saamana).

ओठाला लाली आणि तोंडाला पावडर लावून बसलेल्यांनी खिडकी बंद करावी
Follow us
| Updated on: Dec 21, 2019 | 3:30 PM

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखात पुन्हा एकदा भाजपवर जहरी टीका करण्यात आली आहे (Sanjay Raut criticize BJP in Saamana). ओठाला लाली आणि तोंडाला पावडर लावून बसलेल्यांनी खिडकी बंद करावी, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला. त्यामुळे यावरुन पुन्हा एकदा शिवसेना-भाजप संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आता भाजप याला काय उत्तर देतं याकडे सर्वांचेच लक्ष आहे (Sanjay Raut criticize BJP in Saamana).

संजय राऊत यांनी अग्रलेखात म्हटलं आहे, “2019 मध्ये फडणवीस आणि त्यांच्या मायबापांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्यावर राजकीय बेकार होण्याची वेळ आली. आता तर शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिल्याची घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे ओठास लाली आणि तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकीही बंद करुन घ्यावी. आपल्यात आता कोणतेही नाते उरलेले नाही. नात्यांचेही तसे ओझेच होते, तेही उतरले.

भाजपचं 30 वर्षांचं ओझं उतरवलं असल्याची शुभवार्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं हा प्रयोग गेली 30 वर्षे चालला होता. आता हे उतरवल्याची अधिकृत घोषणा नागपूरच्या विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनीच हे जाहीर केल्यामुळे भाजपने खिडकीत बसून शुक शुक करणे, शीळ मारुन लक्ष वेधून घेणे, दरवाजे उघडे आहेत, आम्ही आजही वाटाघाटीस तयार आहोत, अशी डबडी वाजवणे बंद केलं पाहिजे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.