AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut PC : ईडी, आयटीच्या धाडी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच का? भाजपवाले रस्त्यावर भीक मागतात का? संजय राऊतांचा हल्लाबोल

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात दुसरी पत्रकार परिषद घेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर गंभीर आरोप करत जोरदार हल्ला चढवलाय. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडी किंवा आयकर विभागाच्या धाडी केवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच का? असा सवाल करत भाजपचे लोक काय मुंबईतील रस्त्यावर हातात कटोरा घेऊन भीक मागतात का? अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय.

Sanjay Raut PC : ईडी, आयटीच्या धाडी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच का? भाजपवाले रस्त्यावर भीक मागतात का? संजय राऊतांचा हल्लाबोल
संजय राऊत, खासदार, शिवसेना
| Updated on: Mar 08, 2022 | 4:42 PM
Share

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित लोकांवर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. परब यांच्या सीएच्या घरीही आयकर विभागाने छापा टाकलाय. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना भवनात दुसरी पत्रकार परिषद घेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर (Central Investigation Agency) गंभीर आरोप करत जोरदार हल्ला चढवलाय. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडी किंवा आयकर विभागाच्या धाडी केवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच का? असा सवाल करत भाजपचे लोक काय मुंबईतील रस्त्यावर हातात कटोरा घेऊन भीक मागतात का? अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय.

‘महापालिका निवडणुका होईपर्यंत वार्ड, शाखेतही धाडी पडतील’

संजय राऊत म्हणाले की, आज मुंबईत मोठी हालचाल आहे. धाडीवर धाडी पडत आहेत. त्यासाठी तुम्हालाही मोठं काम आहे. आम्ही विचार केला आम्हीही एक धाड टाकावी. आम्हालाही अधिकार आहे. मुंबईत घुसण्याचा घुसवण्याचा शिवसेनेलाही अधिकार आहे. आमच्या काही कार्यकर्त्यांवर ईडी नाही आता आयटीची रेड सुरु आहे. आयटीची भानामती चालू आहे. मला वाटतं की महापालिका निवडणुका होत नाहीत तोवर प्रत्येक वार्ड, शाखेत रेड पडतील. त्यांना आता एकच काम उरलं आहे. जिथे जिथे शिवसेना तिथे रेड टाकण्याचं काम त्यांच्याकडे आहे’, असा टोला राऊत यांनी ईडी आणि आयटीला लगावलाय.

‘IT, ED ला आतापर्यंत 50 नावं पाठवली’

देशात सध्या हा एकच प्रश्न आहे की फक्त महाराष्ट्र आणि बंगालमध्ये ठराविक लोकांना का टार्गेट केलं जात आहे. या देशात अन्य राज्यात कुणी मिळत नाही का? फक्त शिवसेना किंवा टीएमसीच… हे सरकारवर दबाव टाकून सरकार पाडण्याचा घाट आहे. आयटी आणि ईडीला आम्ही आतापर्यंत 50 नावं पाठवली आहेत. पण ईडी किंवा आयटीला एक जबाबदार खासदार बोलतोय तर त्याबाबत चौकशी व्हावी असं त्यांना का वाटत नाही?, असा सवाल त्यांनी विचारलाय.

‘भाजपवाले काय रस्त्यावर कटोरा घेऊन भीक मागतात काय?’

किरीट सोमय्या यांनी एका केंद्रीय मंत्र्याबाबत 100 बोगस कंपन्यांची यादी दिलीय. कुणी ढवंगाळे आहेत, ते भाजपच्या जवळ आहेत. त्यांच्या 75 बोगस कंपन्यांची यादी मी पाठवली आहे. त्याचं काय झालं? ईडीच्या सर्वाधिक कारवाई महाराष्ट्रात झालीय. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या 14 लोकांवर कारवाई झालीय. भाजपच्या लोकांवर आयटी किंवा ईडीची रेड का नाही? ते लोक काय रस्त्यावर कटोरा घेऊन भीक मागत आहेत का? अशी खोचक टीका संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर केलीय.

इतर बातम्या :

सुमीत कुमार नरवरकडे भाजपच्या महाराष्ट्र, दिल्लीतील बड्या नेत्याचा पैसा, लवकरच पर्दाफाश करणार; राऊतांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut Pc : जितेंद्र नवलानीच्या माध्यमातून ईडीचं वसुलीचं रॅकेट, संजय राऊतांनी यावेळेस पुराव्यानिशी मांडलं, वाचा सविस्तर

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.