“आमचे राज्यपाल करुणेचा सागर, पण मांडीखाली दाबलेले आमदार मोकळे करा”, संजय राऊतांचा कोश्यारींना टोला

राज्यपालांनी त्यांच्या मांडीखाली दाबून ठेवलेले 12 राज्यपाल नियुक्त सदस्य मोकळे करावेत," असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. (sanjay raut governor bhagat singh koshyari)

आमचे राज्यपाल करुणेचा सागर, पण मांडीखाली दाबलेले आमदार मोकळे करा, संजय राऊतांचा कोश्यारींना टोला
भगतसिंह कोश्यारी आणि संजय राऊत
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 11:54 AM

मुंबई : “आमचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे करुणेचा सागर आहेत. करुणा भावनेने त्यांना कायदा आणि घटनेवर करुणा दाखवावी. राज्यपालांनी त्यांच्या मांडीखाली दाबून ठेवलेले 12 राज्यपाल नियुक्त सदस्य मोकळे करावेत,” असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला. (Sanjay Raut criticizes governor Bhagat Singh Koshyari on 12 governer oppointed MLA approval)

मागील कित्येक दिवसांपासून विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्य सरकारने एकूण 12 नियोजित आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवून कित्येक महिने झाले आहेत. मात्र, अद्याप कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या यादीला मान्यता दिलेली नाही. याच मुद्द्यावर ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत काय म्हणाले?

“महाराष्ट्र हा संतांचा प्रदेश आहे. करुणेचा उगम हा महाराष्ट्रातूनच झाला. कदाचित म्हणूनच राज्यपाल भगतसिंह यांना महाराष्ट्रत रमावं वाटतं. आमचे राज्यपाल करुणेचा सागर आहेत. याच करुणा भावनेने त्यांनी कायदा आणि घटनेवर करुणा दाखवावी. 12 राज्यपाल नियुक्त सदस्य त्यांनी त्यांच्या मांडीखाली दाबून ठेवले आहेत. ते त्यांनी मोकळे करावेत,” असे संजय राऊत म्हणाले. तसेच राज्यपाल नियुक्त आमदार मोकळे केले तर राज्यपालांच्या मनात घटनेविषयी करूणा आहे, हे देशाला समजेल,” असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

राज्य सरकार-राज्यपाल वाद

विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवून कित्येत महिने उलटले आहेत. मात्र अद्याप या नावांना राज्यपालांकडून मंजुरी मिळालेली नाही. याच कारणामुळे राज्य सरकारने राज्यपाल कोश्यारी यांच्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या अनेकवेळा टीका केली आहे. राज्यपाल हे भाजपधार्जीणे असल्याचं महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी अनेक वेळा म्हटलेलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष असल्यामुळे मोठ्या मुश्किलीने 12 आमदारांच्या नावांवर एकमत झाले होते. त्यानंतर या नावांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी अशी सरकारची भूमिका राहिलेली आहे. त्यासाठी राज्य सरकारने राजभवनाशी अधिकृतपणे अनेकवेळा पत्रव्यवहार केलेला आहे. पण अजूनही 12 आमदारांची यादी राज्यपालांच्या दफ्तरीच पडून आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी कोश्यारी यांना लक्ष्य केले. तसेच यावेळी बोलताना बलात्काराच्या आरोपामध्ये चर्चेत आलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीविषयी राऊत यांना विचारण्यात आलं. पण याविषयी बोलताना मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच उत्तर देतील असं राऊत म्हणाले. पार्श्वगायिका रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करुन तो पुन्हा वापस घेतला होता.

इतर बातम्या :

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, एकाला एक दुसऱ्याला दुसरा न्याय नको: प्रवीण दरेकर

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारेंच्या भावाविरोधात बलात्काराचा गुन्हा, सुनीत वाघमारे यांना अटक

मोठी बातमी: प्रवीण दरेकरांच्या अडचणीत वाढ; मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणात ऑडिट होणार

(Sanjay Raut criticizes governor Bhagat Singh Koshyari on 12 governer oppointed MLA approval)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.