Sanjay Raut : ‘बाळासाहेबांना जिवंतपणी ज्यांनी त्रास दिला तेच आचा त्यांच्या क्लिप फिरवत आहेत’, संजय राऊतांची राज ठाकरेंवर बोचरी टीका

'बाळासाहेबांना जिवंतपणी ज्यांनी त्रास दिला, तेच आता त्यांच्या क्लिप फिरवत आहेत', अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केलीय. संजय राऊत यांच्या उपस्थितीत पुण्यातील हडपसरमध्ये शिवसेनेची जाहीर सभा पार पडली.

Sanjay Raut : 'बाळासाहेबांना जिवंतपणी ज्यांनी त्रास दिला तेच आचा त्यांच्या क्लिप फिरवत आहेत', संजय राऊतांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
राज ठाकरे, संजय राऊतImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 9:46 PM

पुणे : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन जोरदार राजकारण सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केलाय. तर भाजपकडूनही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन सातत्याने शिवसेनेवर हल्ला चढवण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा एक जुना व्हिडीओ ट्वीट करत उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या भूमिकेची आठवण करुन दिली होती. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘बाळासाहेबांना जिवंतपणी ज्यांनी त्रास दिला, तेच आता त्यांच्या क्लिप फिरवत आहेत’, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केलीय. संजय राऊत यांच्या उपस्थितीत पुण्यातील हडपसरमध्ये शिवसेनेची जाहीर सभा पार पडली.

संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रकार म्हणून जी क्रांती केली ती शब्दात व्यक्त करता येणार नाही. बाळासाहेबांच्या हातात कुंचला नसता तर आज शिवसेनेचे आंदोलन उभं राहिलं नसतं. ही मशाल महाराष्ट्रात तुम्हाला पेटती दिसली नसती. आज महाराष्ट्रात पेटवापेटवीची भाषा करत आहेत. आमचं अख्खं आयुष्य पेटवा पेटवीत गेलंय, असा टोलाही त्यांनी लगावलाय. इतकंच नाही तर सवाल यह नहीं की बस्तिया किसने जलाई, बल्की बंदर के हाथो में माशिस किसने दी? अशा शेरोशायरीद्वारे संजय राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केलीय. गेल्या 15 वर्षात महाराष्ट्रात भोंग्याचा त्रास कुणाला झाला नाही. पण आपले भाऊ मुख्यमंत्री झाले की लगेच त्रास सुरु झाला, असा टोलाही राऊतांनी लगावलाय.

हे सुद्धा वाचा

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंवर टीका

हा महाराष्ट्र बहुजनांचा आहे. शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे. हा महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंचा आहे. महाराष्ट्रात तुम्ही कोणतं विष पेरत आहात. महाराष्ट्रात कशाला जातीपाती फडकवताय? असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्याचाही संजय राऊतांनी समाचार घेतला. तुम्हाला महाराष्ट्रात कोण मुख्यमंत्री हवाय हे लोक ठरवतील. मात्र, सेना आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवेल. बाळासाहेबांनी ब्राह्मण मुख्यमंत्री दिला होता मनोहर जोशी. तुमचेही देवेंद्र फडणवीस ब्राह्मण मुख्यमंत्री होते. आता ते विरोधी पक्षनेते आहेत, असं राऊत म्हणाले.

पाच दिवसांत किरीट सोमय्या जेलमध्ये जाणार

मला अभिमान आहे पुण्यातील शिवसेना कार्यकर्त्यांचा. त्यांनी महापालिकेच्या पायऱ्यांवर दाखवून दिलं. कार्यक्रम अजून वाढला असता. आम्ही जेलमध्ये जायला घाबरत नाही. स्वत: शेण खायचं आणि आमच्या तोंडाचा वास घ्यायचा. उद्योगपतींचा माणूस आहे. दलाल आहे, विक्रांतच्या नावावर पैसे जमा केले ते त्यांनी घरात घातले. हा माणूस फरार होता. आता हा माणूस जामिनावर बाहेर आहे. मात्र दोन दिवसात आरोपपत्र सादर होईल आणि पाच दिवसांत किरीट सोमय्या जेलमध्ये जाणार, असा दावा करत आम्हाला जेलमध्ये टाकेन म्हणतोय, जेल काय तुमच्या बापाचा आहे का? असा सवालही राऊतांनी केलाय.

महागाई, बेकारीबाबत भोंग्यावर सांगा

माझी प्रॉपर्टी जप्त केली. हा महाराष्ट्र गुडघे टेकणार नाही. हा शिवसैनिक तुमच्यापुढे झुकणार नाही. मोदींना प्रश्न विचारतो म्हणून, त्यांची पोलखोल करतो म्हणून माझ्यावर कारवाई. भोंग्यांवर काय बोलता, महागाई किती आहे, बेकारी किती आहे हे पण भोंग्यावर सांगा. योगी आदित्यनाथ कौतुक करतात, नाहीतर आमच्याही मुळा मुठा नदीत प्रेत वाहत राहिली नसती. ज्या गंगेला आपण पवित्र मानतो, तिकडे प्रेतं वाहत होती. भाजप या राज्यातून नामशेष होईल इतकी चीड लोकांच्या मनात आहे. नागपूर महापालिकेत रोज दरोडे पडत आहेत. अब चंपा को कोल्हापूर मैं जगा नही है, पुणेकर आता चंपी करणार आहेत, असा टोलाही राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावलाय.

पुणे महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार

आपण वाघ आहोत, शेपटावर पाय ठेवला तर सोडणार नाही. पुण्याच्या बाबतीत सावधपणे पाऊल टाकू. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिकेवर भगवा फडकवणार. तुम्हाला वाटलं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. मला फक्त वाटलं नव्हतं तर आत्मविश्वास होता, असा दावाही राऊत यांनी केलाय. तुमच्याशिवाय राज्य आमच्या ताब्यात येईल ही ताकद आमच्या मनगटात आहे, असा दावाही राऊतांनी केलाय.

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.