Sanjay Raut : आता कॉमेडी एक्सप्रेसचा सीझन 2 सुरु, शिवसेनेच्या नव्या कार्यकारणीवरून राऊत संतापले
विधीमंडळात निर्माण झालेल्या परस्थितीमुळे पक्षाने याचिका दाखल केली आहे. त्यासंदर्भात 20 जुलैपासून सुनावणी सुरु होणार आहे. शिवाय न्यायालयावर आपला विश्वास असून पक्षाची बाजू हीच भक्कम असल्याचा दावा राऊतांनी केला आहे. जी भीती आमदारांना होती तीच भीती खासदारांना असल्याने त्यांनी एक गटाने शिंदे गटात प्रवेश केला आहे.
मुंबई : आमदारांपाठोपाठ आता (Shiv Sena Party) शिवसेना पक्षातून (Member of The Lok Sabha ) खासदारांनीही बंड करुन शिंदे गट जवळ केला आहे. असे असताना त्याचा काहीही परिणाम पक्षावर होणार नाही असेच दाखविण्याचा प्रयत्न (Sanjay Raut) खा. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. हा प्रकार म्हणजे कॉमेडी एक्सप्रेसचा सीझन 2 असल्याची मिश्किल टिपण्णी त्यांनी केली आहे. कॉमेडी एक्सप्रेसचा सीझन 1 हा विधीमंडळात झालेला आहे. त्यासंदर्भात 20 जुलै रोजी न्यायालयात सुनावणी सुरु होत आहे. सर्वोच्च न्यायालयात फुटीर गटाचा निकाल लागणार आहे. त्याच फुटीरतेचा हा दुसरा भाग असल्याचे म्हणत बंडखोर खासदारांवर बोचरी टिका केली आहे. शिवाय याचा कोणताही परिणाम पक्षावर होणार नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
न्यायालयात न्याय मिळेल, फुटीरांचा पक्षावर परिणाम नाही
विधीमंडळात निर्माण झालेल्या परस्थितीमुळे पक्षाने याचिका दाखल केली आहे. त्यासंदर्भात 20 जुलैपासून सुनावणी सुरु होणार आहे. शिवाय न्यायालयावर आपला विश्वास असून पक्षाची बाजू हीच भक्कम असल्याचा दावा राऊतांनी केला आहे. जी भीती आमदारांना होती तीच भीती खासदारांना असल्याने त्यांनी एक गटाने शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवाय या गटाला कार्यकरणी बरखास्त करण्याचा अधिकार दिला कोणी असा सवाल उपस्थित करीत त्यांच्या या निर्णयाचा परिणाम ना पक्षावर होणार आहे ना शिवसैनिकावर असेही राऊतांनी ठणकावले आहे.
गट फुटीर पण तेवढाच उतावीळही
खासदारांची भूमिकेचा परिणाम खऱ्या शिवसेनेवर होणार नाही. तो एक फुटीर गट आहे. त्याला आणखी पक्ष म्हणून मान्यता मिळालेली नाही आणि तो थेट कार्यकरणी बरखास्त करण्याचा निर्णय कसा काय घेऊ शकतो. तर हा एक उतावीळपणाचे लक्षण आहे. पक्षाची कार्यकरणी बरखास्त करुन लागलीच स्वत:ची कार्यकरणी जाहीरही केली जाते म्हणून हा एक्सप्रेसचा सीझनचा पार्ट दोन आहे. लोक यांच्यावर हसत आहेत, मजा घेत आहेत. पण त्यांची ही भूमिका लोकांनाही पटलेली नसल्याचे राऊतांनी सांगितले आहे.
कातडी बचावासाठी सर्वकाही
बंडाची भूमिका घेऊन देखील ते शिवसैनिक असल्याचे सांगत आहेत. पण हे बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक नाहीतच. केवळ स्वार्थ आणि कातडी बचावासाठी घेतलेला निर्णय आहे. त्यांनी स्वार्थ साधला असला तरी जनता ही सर्व पाहत आहे. त्यामुळे आगामी काळात याचे परिणाम पाहवयास मिळतील असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला आहे.