Maharashtra Political Crisis : गुजरातसोबतच महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका? राऊत म्हणतात, ही भाजपची तात्पुरती तजवीज

राज्यात स्थापन झालेल्य नवीन सरकारबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत. भाजपाने घेतलेला निर्णय एवढा सहजतेने नसेल, यामागे राजकारण असणार असा प्रत्येकाचा अंदाज आहे. पण भाजपाने ही तात्पुरती व्यवस्था केली आहे. भाजपामध्ये वेगळेच काहीतरी शिजत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

Maharashtra Political Crisis : गुजरातसोबतच महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका? राऊत म्हणतात, ही भाजपची तात्पुरती तजवीज
खा. संजय राऊत
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 10:36 AM

मुंबई :  (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांच्यासह 39 आमदारांच्या बंडानंतर आता कुठे नवीन सरकार अस्तित्वात आले आहे. आणखी खातेवाटप आणि बहुमत सिध्द करणे बाकी असतानाच राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील या चर्चेला उधाण आलयं. राज्यातील परस्थिती आणि त्या परस्थितीतून निर्माण झालेले सरकार हे टिकावू नसून अल्पावधीतच मध्यावधी निवडणुका लागतील असे विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा (Sharad Pawar) शरद पवार यांनी केले होते. त्यानंतर आता (Sanjay Raut) खा. संजय राऊत यांनीही त्यांच्या सुरात सूर आवळला आहे. शिवाय यामागेच कारणही त्यांनी स्पष्ट केलयं. आतापर्यंत राज्यातील जनतेने गेल्या 15 दिवसांमध्ये झालेले राजकीय नाट्य पाहिले आहे. आता भविष्यात मध्यावधी निवडणुका की आणखी काही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. मात्र, राज्यातील दोन नेत्यांनी केलेले हे विधान महत्वाचे मानले जात आहे.

ही तर तात्पुरती व्यवस्था

राज्यात स्थापन झालेल्य नवीन सरकारबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत. भाजपाने घेतलेला निर्णय एवढा सहजतेने नसेल, यामागे राजकारण असणार असा प्रत्येकाचा अंदाज आहे. पण भाजपाने ही तात्पुरती व्यवस्था केली आहे. भाजपामध्ये वेगळेच काहीतरी शिजत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. सध्याचे स्थापन झालेले सरकार ही तात्पुरती व्यवस्था आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका तर लागतीलच कदाचित गुजरात बरोबरच महाराष्ट्रातही निवडणुका लागतील असा माझा अभ्यास असल्याचेही राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे भविष्यात राजकीय पटलावर आणखी नव्या अध्यायाला सुरवात होणार का हे पहावे लागणार आहे.

शिवसेना फोडायची होती म्हणून खटाटोप

राज्याच्या हितासाठी नाहीतर भाजपाच्या टार्गेटवर शिवसेना होती म्हणूनच भाजपाने ही खेळी केली आहे. भाजपाला शिवसेना फोडायची होती म्हणून हे सर्व घडवून आणले आहे. या मुद्द्यावरुनच फुटीर गटाच्या नेत्याला मुख्यमंत्री पद देण्यात आल्याचे राऊत म्हणाले आहेत. केवळ हाच उद्देश भाजपाचा होता. यापलिकडे त्यांचा कोणताही उद्देश नव्हता. पण ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. हे सरकार अधिक काळ टिकेल असे नाही आणि अनेकांना ते टिकवायचे असेही नाही. त्यामुळे मध्यावधी निवडणुंका लागतील त्या देखील लवकरच असेही राऊत म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

भाजपाचा उद्देश साध्य

गेल्या 15 दिवासांमध्ये राज्यात ज्या घडामोडी घडल्या त्यामागे केवळ शिवसेनेचे नुकसान हाच भाजपाचा डाव होता. तो फुटीर आमदारांमुळे साध्य झाला पण हे सरकार अधिक काळ टिकेल असे नाही. शिवसेनेने अशी संकटे यापूर्वी पाहिलेली आहेत. त्यामुळे यामधूनही सावरण्यासाठी अधिकचा काळ लागणार नाही. जे झाले त्याकडे दुर्लक्ष करुन आता पक्ष संघटनेवर भर असल्याचे राऊत म्हणाले आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.